Friday, July 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशालार्थ घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी - शिक्षणमंत्री दादा भुसे

शालार्थ घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी – शिक्षणमंत्री दादा भुसे

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. हे प्रकरणे केवळ नागपूर जिल्ह्यात मर्यादित नसून राज्यातील इतर जिल्ह्यातही फोफावली असल्याची शंका आमदारांनी सभागृहात व्यक्त केली. अखेर याप्रकरणी राज्यव्यापी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली. या एसआयटीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सनदी अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात येईल. येत्या तीन ते चार महिन्यात एसआयटीला चौकशी अहवाल देण्याची सूचना करण्यात येईल. त्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही भुसे यांनी सांगितले.

भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी नागपूर जिल्ह्यातील एक हजारहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ आयडीमध्ये समाविष्ट करुन कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत आमदारांनी या प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, यावेळी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी नाशिक विभागातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची यादी जाहीर करताना हे अधिकारी वर्षांनुवर्षे त्याच जागेवर काम करीत असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना दादा भुसे म्हणाले की, याप्रकरणी राज्यव्यापी एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकरणात कोणाचीही हयगय केली जाणार नाही. नागपूरच्या प्रकरणात चौकशी सुरु आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत १९ जणांविरोधात फौजदारी कारवाई झालेली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक समिती स्थापन करण्यात आली असून चौकशीत जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

ताज्या बातम्या

पडसाद : त्र्यंबकची माळीण होऊ द्यायची नसेल तर…

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक त्र्यंबकेश्वर आणि आजूबाजूचा परिसर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीचा सामना करीत आहे. अलीकडेच आलेल्या...