मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल (Result) शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) २८८ पैकी २३६ जागांवर यश मिळाले. यात भाजपला १३२, शिवसेनेला ५७, तर राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. याशिवाय भाजपच्या मित्रपक्षांना पाच, तर शिंदेंच्या मित्रपक्षांना एका जागेवर यश आले आहे. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला ४६ जागा आल्या आहेत. यामध्ये काँग्रेसला १६, राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना १० जागा, तर शिवसेना (ठाकरे गट) २० जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात कोणत्या पक्षाला किती मतं? समोर आली आकडेवारी
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीने अनेक दिग्गजांना तिकीट दिले होते. यात विधानपरिषदेवर आमदार (MLA) असलेल्या काही नेत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता महायुतीमधील घटक पक्षांतून आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आलेल्या आमदारांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली आहे. त्या जागी आता महायुतीच्या सहा नेत्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे.
हे देखील वाचा : Maharashtra News : राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड
विधानसभेच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या (Legislative Council) एकूण सहा जागा रिक्त झाल्या आहेत. त्यात भाजपच्या चार जागांचा समावेश आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके यांची नावे आहेत. तर शिवसेनेकडून आमश्या पाडवी यांची विधानसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचीही एक जागा विधानपरिषदेत रिक्त होणार आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर हे देखील विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. यानुसार महायुतीच्या विधानपरिषदेच्या एकूण ६ जागा रिक्त झाल्या आहेत.त्यामुळे आता महायुतीचे तिन्ही घटकपक्ष नेमकं कोणाला संधी देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा