Sunday, August 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिंडोरीत स्मार्ट वीज मीटरचा ग्राहकांना झटका; थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित

दिंडोरीत स्मार्ट वीज मीटरचा ग्राहकांना झटका; थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित


दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

दिंडोरी शहरात व तालुक्यात स्मार्ट मीटर यंत्रणा कार्यान्वित झाली असून आज अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. वीज देयक न भरल्याने अचानक वीज पुरवठा खंडित केल्याने अनेक ग्राहकांनी वीज कंपनी बाबत नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -


वीज कंपनीने मागील वर्षी दिंडोरी शहरात व तालुक्यात स्मार्ट मीटर बसविले. काही ठिकाणी विरोध झाला तर काही ठिकाणी ग्राहकांनी सहकार्य केले. ज्या ग्राहकांनी सहकार्य केले त्या ग्राहकांना या मीटरची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाल्याने जोरदार झटका बसला. ज्यांनी वीज कंपनी चे देयक भरले नाही त्यांचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला.

घरातील वीज पुरवठा बंद झाल्याने या ग्राहकांना वीज पुरवठा का खंडित झाला याचे कारण समजत नव्हते. कारण स्मार्ट मीटर मध्ये वीज पुरवठा लाईट दिसत होता. शेवटी अनेकांनी वीज कर्मचाऱ्यांना मोबाईल वरून विचारणा केली. काही वीजतंत्रिनी तपासणीही केली. पण वीज पुरवठा का खंडित झाला याचे तत्काळ उत्तर देता आले नाही.

शेवटी स्मार्ट मीटर यंत्रणा कार्यान्वित झाल्याची माहिती मिळाली. ज्यांनी तातडीने फोन पे वर स्मार्ट मीटर क्रमांक टाकून वीज बिल भरले त्यांचा वीज पुरवठा 20 मिनिटांनी सुरू झाला. पण ज्यांच्याकडे फोन पे सुविधा नाही त्यांना मात्र रात्र अंधारातच काढावी लागणार आहे.

वीज कंपनीने स्मार्ट मीटर बसवले पण ते कार्यान्वित केले नाही. जर स्मार्ट मीटर यंत्रणा कार्यान्वित झाल्याची व वीज पुरवठा अचानक खंडित केला जाणार होता हे वीज कंपनीला माहिती होते तर वीज कंपनीने ग्राहकांना माहिती का दिली नाही असा प्रश्न वीज ग्राहकांनी विचारला आहे.

शनिवार असल्याने वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान वीज कंपनीने स्मार्ट मीटर यंत्रणा सुरू झाल्याची माहिती देणे आवश्यक असून स्वयंचलित यंत्रणेबाबत तातडीने सर्व तपशीलवार माहिती अधिकाऱ्यांनी वीज ग्राहकांना द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सोनल प्रदीप घोरपडे , नगर सेवक सुजित मुरकुटे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

त्यांना राजकीय आकांक्षा असण्यात काहीच गैर नाही, पण…; दीपके, दास अन्...

0
दिल्ली । Delhi दिल्लीतील जंतर-मंतरवर सलग २६ दिवस अन्नत्याग उपोषण करून केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेणारे प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक सध्या एका...