Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसरकारी तांदूळाची आफ्रिकेत तस्करी - अंबादास दानवे यांचा आरोप

सरकारी तांदूळाची आफ्रिकेत तस्करी – अंबादास दानवे यांचा आरोप

चौकशी करण्याची राज्य सरकारकडे मागणी

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी तांदूळाची तस्करी सुरु असून जे. वी. ग्रेन्स डीलर्स या नोंदणीकृत संस्थेकडून हा तांदूळ दक्षिण आफ्रिकेला पाठवून तस्करी केली जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी केला. या संदर्भात दानवे यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दानवे यांनी आज एक्स या समाज माध्यमातून तांदूळ घोटाळ्याचा गौप्यस्फोट केला आहे शालेय शिक्षण विभागाच्या संचालक (प्राथमिक) कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने ट्रस्टचे अध्यक्ष अनिलकुमार गुप्ता शालेय विद्यार्थ्यांसाठी वाटप होणारा तांदूळ परदेशात, विशेषता आफ्रिकन देशांमध्ये तस्करी करत असल्याची आपली खात्रीशीर माहिती असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

जे. वी. ग्रेन्स डीलर्स ही नोंदणीकृत संस्था सामाजिक कार्यासाठी नोंदवली गेली. मात्र, या संस्थेला मुंबई जिल्ह्यातील तांदूळ वाहतुकीचे कंत्राट देण्यात आले आहे. या संस्थेला होणार नफा सामाजिक उपक्रमासाठी वापरण्याऐवजी गुप्ता हे स्वतःच्या फायद्यासाठी वापरात असल्याचे समोर आले आहे. संस्थेत ८० टक्के भागधारक असलेले अनिलकुमार गुप्ता हेच तांदूळ वाहतुकीचे उपकंत्राटदार आहेत. यांना हे उपकंत्राट देताना नियम जात्यात दळून टाकण्यात आले, असा आरोप दानवे यांनी केला आहे.

जे. बी. ग्रेन डीलर्सच्यावतीने कोणतेही सामाजिक काम झालेले नाही. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी रेल्वे प्रशासनाने यांचे एक कंत्राट मुदतीपूर्वीच रद्द केले आणि अनामत रक्कम सुद्धा जप्त केली आहे. अशा संस्थेला कोणतेही टेंडर देता येत नाही. मग गुप्ता हे महायुती सरकारचे लाडके लाभार्थी कसे? असा सवाल करत दानवे यांनी या प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करून संस्थेची नोंदणी रद्द करण्यात यावी. तसेच टेंडर घोटाळ्यात दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...