Tuesday, September 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया श्री काळाराम चरणी लीन

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया श्री काळाराम चरणी लीन

नाशिकच्या राजकरणातही लक्ष्य घालावे लागणार असल्याचे सुचक वक्तव्य

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी

लवकरच नाशिकच्या राजकरणातही लक्ष्य घालावे लागेल असे सुचक वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंंजली दमानिया यांनी आज येथे केले.त्यामुळे राजकीय वर्तूळात उलट सुलट चर्चेला उधान आले आहे. भविष्यात त्या कोणत्या मंत्र्याला की अधीका़र्‍याला लक्ष्य करतात की काय अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.

दमानीया आज नाशिक दौ़र्‍यावार आल्या होत्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचा द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यास त्या नाशिकरोड येथे जितंद्र भावे यानी आयोजीत केलेल्या कार्यक्रमास उपस्थीत होत्या. तत्त्पुर्वी त्यांनी दुपारी काळाराम मंदीरात जाऊन दर्शन घेतले. या वेळी मंंदार जानोरकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांंनी वरील सुचक वक्तव्य बोलतांना केले.

आज दिवस भरात त्यांना आंंदोलन करणारे काही ठेकेदार,तसेच निफाड कारखााण्याचे कर्मचारी, तसेच बिर्‍हाड आंंदालकही भेटले, त्यामुळे दमानीया आता वंचीत घटकांना एक आशेचा किरण वाटु लागल्याचे दिसुन आले.

आता त्या कोणत्या मंत्र्याला लक्ष्य करतात याकडे लक्ष्य लागलेआहे. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल काही मोठे दावे त्यांनी केले आहेत.पुढील महिन्यात महाराष्ट्रातील राजकारणावरही परीणाम होईल, असे दमानिया यांनी म्हटले आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला सत्ताधारी घटक पक्षांचे पुरेसे समर्थन मिळत नसावे त्यामुळेच महाविकास आघाडीच्या नेत्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असावेत. असेही त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्या

ऊस

State Cabinet Meeting: ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन...

0
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला अभ्यासिका व वाचनालयासाठीच्या भाडेपट्ट्यासाठी मुद्रांक शुल्क माफ मुंबई | Mumbaiमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी,...