Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमCrime News : दारू पिण्यास पैसे न दिल्याने मुलाचा आईवर चाकू हल्ला

Crime News : दारू पिण्यास पैसे न दिल्याने मुलाचा आईवर चाकू हल्ला

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील भारजवाडी गावातील एक मुलाने दारू पिण्यासाठी (Drink Alcohol) पैसे न दिल्याच्या रागातून आईच्या पोटात चाकूने वार (Mother Attack) करून गंभीर जखमी केले. ही घटना दिनांक 14 जून रोजी दुपारी घडली असून या प्रकरणात आरोपी मुलगा अजिनाथ मधुकर ढाकणे (वय 35) यास सोमवारी अटक (Arrested) करण्यात आली. रंभाबाई मधुकर ढाकणे (वय 60, रा. भारजवाडी) अशी गंभीर जखमी झालेल्या आईचे नाव आहे. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

घटनेच्या दिवशी रंभाबाई ढाकणे या घरात एकट्याच असताना आरोपी मुलाने (Son) दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न मिळाल्याने संतापलेल्या अजिनाथने आपल्या पँटच्या खिशातून चाकू काढून थेट आईच्या पोटात वार केला. जोरात ओरडल्याने घराजवळच असलेले नातेवाईक पप्पू बटुळे यांनी धावत येत जखमी (Injured) महिलेला वाचवले आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले. रंभाबाई यांची मुलगी मनिषा ज्ञानदेव बटुळे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात (Pathardi Police Station) फिर्याद दिली.

पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपीस अटक (Arrested) केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव करीत आहेत. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे.

 

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ‘ती’ फाईल गंगापूररोडच्या एका बिल्डरची?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरे आणि भाजपचे नगरसेवक सतीश निकम (Satish Nikam) यांच्यात झालेल्या वादाच्या केंद्रस्थानी असलेली ती फाईल...