Thursday, March 13, 2025
Homeक्राईमझापवाडी शिवारात आढळला महिलेचा मृतदेह

झापवाडी शिवारात आढळला महिलेचा मृतदेह

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील (Newasa) सोनई जवळील झापवाडी शिवारात एका महिलेचा मृतदेह (Woman Dead Body) आढळून आला आहे. याबाबत माहिती अशी की, झापवाडी शिवारातील कॅनॉल जवळील अशोक शिंदे यांच्या उसाच्या शेताजवळ 60 वर्षे वयाच्या अज्ञात महिलेचा मृतदेह सोमवार दि. 16 रोजी सकाळी 8 वाजता आढळून आला.

- Advertisement -

नऊवार साडी, केसाला लाल रंग, उजव्या हातावर तुळशीचे पान गोंदलेले, गळ्यात स्कार्फ व त्यावर लाल रंगाचे फुले असे वर्णन आहे. सोनई पोलिसांनी (Sonai Police) मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून सदर महिलेस ओळखत असणार्‍यांनी सोनई पोलीस ठाण्याची (Sonai Police Station) संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...