
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर (Jantar Mantar) मैदानावरील आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Social Activist Sonam Wangchuk) यांना शनिवारी (१८ जुलै) दिल्ली पोलिसांनी उचलून सफदरगंज रुग्णालयात (Safdarganj Hospital) दाखल केले. यानंतर, कॉक्रोच जनता पार्टीने (Cockroach Janata Party) रोष व्यक्त करत सरकारवर नाराजी व्यक्त केली. यानंतर सोनम वांगचुक यांनी सोमवारी सकाळी एक महत्त्वाचे ट्विट (X Post) केले आहे. या ट्विटमध्ये सोनम वांगचूक यांनी काही अटींच्या (Demands) मोबदल्यात आपले आमरण उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. या अटी आता केंद्र सरकार मान्य करणार का, हे बघावे लागेल.
सोनम वांगचुक यांनी पत्रात काय म्हंटले आहे?
आपले हे पत्र सोशल मीडियावर शेअर करत सोनम वांगचुक यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
“माझी प्रकृती उत्तम आहे. पोलिसांनी मला ताब्यात घेतलेले नाही, असा दावा केला जात आहे. जर मला स्थानबद्ध केलेले नाही, तर मग माझ्या हालचालींवर निर्बंध कशासाठी लादले जात आहेत?” असा परखड सवाल त्यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून केला आहे.
दुसरीकडे, सफदरजंग रुग्णालय प्रशासनाने जारी केलेल्या वैद्यकीय अहवालानुसार, वांगचुक यांच्या शरीराचे महत्त्वाचे घटक स्थिर आहेत. मात्र, रक्ताच्या चाचण्यांच्या अहवालानुसार त्यांना अजूनही डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवणे गरजेचे आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
सोनम वांगचुक सरकारपुढे ठेवलेल्या अटी
सोनम वांगचुक यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे की, मी माझे उपोषण कधी संपवेन? माझ्या आरोग्याची पर्वा न करता ‘संसद चलो मोर्चा’ पूर्ण होईपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार आहे. तो फक्त काही अटींवरच सोडणार आहे.
१) शिक्षण व्यवस्थेतील कमतरता, जसे की पेपर फुटणं, पेपर लीक होणं, विक्री होणं याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे.
२) मी आणि कॉक्रोच जनता पार्टीचं नेतृत्व करणारे अभिजीत दीपके हे जर संसदेपर्यंत मोर्चा घेऊन पोहचलो तर विविध पक्षांच्या खासदारांनी आम्हाला हे आश्वासन द्यावं की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आम्ही संसदेतल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवू.
३) माझी प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मला जर संसदेत जायची संमती दिली गेली नाही तर विविध पक्षांचे खासदार मला हा विश्वास देऊ इच्छित असतील की मी केलेल्या दोन अटींबाबत ते आवाज उठवीतल तर मी उपोषण मागे घ्यायला तयार आहे.
हे सगळे मी मला अनधिकृत पद्धतीने ताब्यात ठेवण्यात आलेल्या सफदरगंज रुग्णालयातून सांगत आहे. याठिकाणी माझ्या हालचालींवर, बोलण्यावर आणि संपर्क साधण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
सोनम वांगचुक यांच्या पत्नी काय म्हणाल्या?
सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो रविवारी (19 जुलै) म्हणाल्या की, जर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी रुग्णालयात सोनमला भेटून पावसाळी अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील उत्तरदायित्वाचा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिले, तर ते आपले उपोषण मागे घेतील. सोमवारी नियोजित असलेल्या सीजेपीच्या ‘चलो संसद’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि शिस्त राखण्याचा वांगचुक यांचा आंदोलनाच्या समर्थकांना दिलेला संदेशही त्यांनी दिला.




