Monday, July 6, 2026
HomeनगरParner : एसपींच्या आदेशाने अवैध वाळू उपशावर ‘क्रॉस रेड’

Parner : एसपींच्या आदेशाने अवैध वाळू उपशावर ‘क्रॉस रेड’

पारनेर तालुक्यातील मुळा नदीपात्रात कारवाई

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पारनेर तालुक्यातील देसवडे येथील मुळा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर घारगाव पोलिसांनी ‘क्रॉस रेड’ केली आहे. या कारवाईत जेसीबी, ट्रॅक्टर-ट्रॉली, डंपर, टेम्पो अशी सुमारे 22 लाख 10 हजार रूपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली असून सहा जणांविरूध्द पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन यांना देसवडे परिसरातील मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने घारगाव पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार सोमवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या नेतृत्वाखाली घारगाव पोलीस ठाण्याचे पथक देसवडे येथे दाखल झाले. पथकाने नदीपात्रात छापा टाकत वाळू उपसा आणि वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई केली.

कारवाईदरम्यान वाळू उपशासाठी वापरला जाणारा एक विना क्रमांकाचा जेसीबी, ट्रॅक्टर-ट्रॉली तसेच डंपर, टेम्पो अशी वाहने आढळून आली. या सर्व वाहनांचा वापर नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा आणि वाहतुकीसाठी होत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. या प्रकरणात सहा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूध्द पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोशन भाऊसाहेब बर्डे (वय 23, रा. वनकुटे), वैभव सिताराम गुंड (रा. देसवडे), नवनाथ रघुनाथ ढोकरे (वय 40, रा. खडकवाडी), अभिषेक संतोष भोर (वय 24 रा. देसवडे), श्रीहरी बाळू पवार (रा. तास), मनोज टेकुडे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस हवालदार ढोकरे, चांगदेव नेहे, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके आदींच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरणातील साठा आज 4000 दलघफूच्या पुढे जाणार

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण पाणलोटात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात पाण्याची आवक जोमाने होत आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील...