Friday, September 20, 2024
Homeनगरसमाजाचे स्वास्थ बिघडवणार्‍यांवर पोलिसच कारवाई करणार

समाजाचे स्वास्थ बिघडवणार्‍यांवर पोलिसच कारवाई करणार

जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांचा पाथर्डीत इशारा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

- Advertisement -

दोन समाजामध्ये स्वास्थ बिघडवणारे वक्तव्य करणार्‍या व्यक्तींवर पोलीस स्वतःहून कारवाई करता आहे. यापुढे कुणी असे प्रकार करण्याचा प्रयत्न केला, तर पोलीस पुढाकार घेऊन तेढ निर्माण करणार्‍यावर कठोर कारवाई करतील, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे. येणारे सर्वच सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ओला यांनी केले.

पाथर्डी पोलीस ठाण्यात ओला यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याची शांतता कमिटीची बैठक आगामी गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, नवरात्र व येणारे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी आ. मोनिका राजळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, तहसिलदार उद्धव नाईक, पोलिस निरिक्षक संतोष मुटकुळे, डॉ. मृत्यूंजय गर्जे, नंदकुमार शेळके, शिवशंकर राजळे,भगवान दराडे, बंडू बोरुडे, गोकुळ दौंड, संतोष जिरेसाळ, चांद मणियार, मुकूंद गर्जे, फारुक शेख, शन्नो पठाण, रमेश गोरे, गोपालसिंग शेखावत, आतिष निर्‍हाळी, रविंद्र आरोळे, उध्दव माने, अंकुश कासोळे, प्रशांत शेळके, अंकुश बोके, सचिन नागापुरे, डॉ. सुहास उरणकर उपस्थित होते.

यावेळी ओला म्हणाले, सार्वजनिक गणेश मंडळाने पाथर्डी येथील सुवर्णयुग तरुण मंडळाचा आदर्श घेऊन मिरवणुकीत पारंपारिक वाद्याचा वापर करून सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करावे. पोलीस दलातर्फे माहिती पुस्तिका काढण्यात आली असून आत जिल्ह्यातील अधिकारी यांचे संपर्क व पोलीस ठाण्याचे क्रमांक असून गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा अशी माहिती देण्यात आली आहे. पोलीसांच्या भेटी या पुस्तकांमध्ये नोंदल्या जाणारा असून त्यावेळी मंडळाचे सदस्य ही उपस्थित असल्याची नोंद घेतली जाणार आहे. अडचणीची स्थानिक पातळीवर सोडवणूक झाली नाही, तर वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्कात राहून त्या सोडवाव्यात. अनाधिकृत फ्लेक्स लावण्यावर नगर परिषदेने पोलिसांना कळवावे, त्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतील. आगामी काळात प्रत्येक तीन महिन्यातून एकदा शांतता कमिटीची बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन यावेळी ओला यांनी दिले. आ. राजळे म्हणाल्या, शहरात रस्ते खोदले गेल्याने खड्डे पडले आहे.

पालिकेने हे रस्ते बुजवावेत. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. छोट्यामोठ्या व्यवसायिकांनी रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. तिसगाव येथील छेडछाडीच्या घटनेत आळा बसण्यासाठी पोलीस विभागाने ही लक्ष घालावे. गणेशोत्सव ईद-ए-मिलाद शांततेत आणि सलोख्याने साजरा करावा, असे आवाहन केले. या बैठकीत सीसीटीव्ही कॅमेरे, जलवाहिनीसाठी खोदलेले रस्ते, फ्लेक्स बोर्डवर निर्बंध, रहदारीला अडथळा ठरणारे अतिक्रमणे यासह वारंवार खंडित होणारी विज हे विषय उपस्थित करण्यात आले. नगर परिषदेचे अमोल मदने, वीज वितरणचे, सहायक पोलिस पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे, प्रभाकर भोये, महादेव गुट्टे, विलास जाधव, निवृत्ती आगरकर, गुप्तवार्तहाचे भगवान सानप उपस्थित होते. प्रास्तविक संतोष मुटकुळे, सूत्रसंचलन अजय भंडारी यांनी करून आभार शिवाजी तांबे यांनी मानले. पोलीसांच्यावतीने तिसगाव येथील वृद्धेश्वर चौकातील टवाळखोरांचा बंदोबस्त केला जाईल. तसेच मुलींच्या छेडछाडी रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक नेमण्याचे आश्वासन देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या