Monday, September 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजडोंगराळेतील बालिकेच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

डोंगराळेतील बालिकेच्या हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

- Advertisement -

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

तालुक्यातील डोंगराळे येथील चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करीत तिचा खून केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा खटला चालविण्यासाठी जनक्षोभाची दखल घेत राज्य शासनाने विशेष सरकारी वकील अ‍ॅड उज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे विधी व न्याय विभागातर्फे आज ही सूचना काढण्यात आले आहे

तालुक्यातील डोंगराळे येथे रविवार 16 नोव्हेंबर रोजी दुपारी घराबाहेर खेळत असलेली चार वर्षीय बालिका बेपत्ता झाली होती कुटुंबासह ग्रामस्थांतर्फे तिचा सर्वत्र शोध घेतला गेला. मात्र ती न सापडल्याने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती ग्रामस्थ रात्री शोध घेत असताना या बालिकेचा मृतदेह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लगत असलेल्या मोबाईल टावरच्या परिसरातील झुडपात संशयास्पद रित्या आढळून आला होता यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती.

नाशिक येथील रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली असता सदर बालिकेवर अत्याचार करण्यात येऊन तिचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते यामुळे मालेगाव तालुक्यासह संपूर्ण राज्यात जनशोभ उसळला होता पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवीत हे कृत्य करणाऱ्या नराधम विजय संजय खैरनार या संशयीतास अटक करीत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता सदर निंदनीय घटनेचा निषेध व आरोपीस जलद गती न्यायालयात खटला चालवीत फाशीची शिक्षा द्यावी यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी या मागणीसाठी समस्त मालेगाव करांतर्फे बंद पुकारण्यात येऊन जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

विविध सामाजिक संघटनांनी देखील कॅन्डल मार्च काढत संशयित आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली होती या मागणीची गंभीर दखल घेत राज्य शासनाने हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे या नियुक्ती सूचना आज विधी व न्याय विभागात तर्फे काढण्यात आले आहे

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘बॉस’ने सांगितलं म्हणजे विषय संपला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील नेत्यामध्ये माझ्या नावावर सहमती होत नसेल आणि वाद होत असतील, तर मला जिल्हा बँकेच्या पदावर बसण्याची कोणतीही इच्छा नाही, असे स्पष्ट...