Thursday, November 5, 2026
Homeदेश विदेशमतदार यादीत नाव नोंदवण्याची मोठी संधी! अरुणाचलसह ६ राज्ये-केंद्रशासित प्रदेशांत निवडणूक आयोगाची...

मतदार यादीत नाव नोंदवण्याची मोठी संधी! अरुणाचलसह ६ राज्ये-केंद्रशासित प्रदेशांत निवडणूक आयोगाची नवी प्रक्रिया

नवी दिल्ली | New Delhi
बिहारपासून सुरू झालेल्या मतदार यादीच्या सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आता सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाची (SSR) प्रक्रिया जाहीर केली आहे. या प्रक्रियेनंतर अंतिम मतदार याद्या २१ जानेवारी रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. SIR वरून विरोधक आक्रमक झाले असतानाच ही घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. SIR प्रक्रियेत नावं वगळली गेल्याचा मुद्दा देशभरात चर्चेत आहे. विशेष म्हणजे २०२७ मध्ये १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनाही आगाऊ अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून निवडणूक आयोगाने सांगितले की, २९ सप्टेंबर रोजी आयोगाने मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या व्यक्ती, तरुण आणि पहिल्यांदाच मतदानासाठी पात्र ठरलेल्या नागरिकांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते.

- Advertisement -

भारतीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२७ ही पात्रता तारीख मानून, ६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्विलोकनासाठी (SSR) आदेश जारी केला आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, एसएसआर प्रक्रिया खालील सहा राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, चंडीगड, दादरा नगर हवेली-दीव दमण, मिझोराम, ओडिशा, सिक्किम यांचा समावेश आहे.

आयोगाने स्पष्ट केले आहे की, ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रिया सुरू आहे किंवा पूर्ण झाली आहे, तेथील SSR वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. यामध्ये आंध्र प्रदेश, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मेघालय, नागालँड, दिल्ली, त्रिपुरा आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमधील हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन एसएसआरच्या तारखा नंतर ठरवल्या जातील.

संपुर्ण एसएसआर वेळापत्रक
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण – २० नोव्हेंबर, २०२६

एकात्मिक मसुदा मतदार यादीचे प्रकाशन – ३० नोव्हेंबर, २०२६

दावे आणि आक्षेप कालावधी – ३० नोव्हेंबर, २०२६ ते ३० डिसेंबर, २०२६

अंतिम मतदार यादीचे प्रकाशन – २१ जानेवारी, २०२७

ताज्या बातम्या

Balasaheb Thorat : महाराष्ट्रातील सहकार मोडण्याचे पाप मुख्यमंत्र्यांनी करू नये –...

0
नाशिक । प्रतिनिधी | Nashik गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर सत्ता बळकावण्यासाठी राज्य सरकारकडून पाच नामनिर्देशित संचालक वाढविण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे....