Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'देशदूत इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘देशदूत इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रदर्शनाचा उद्या शेवटचा दिवस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

युवकांपासून व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत विविध श्रेणीतील शेकडो नागरिकांच्या भेटीचा ओघ हे ‘इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो’च्या दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. शनिवारची सायंकाळ स्वप्नातील घराच्या शोधात घालवून इंदिरानगर आणि परिसरातील नागरिकांनी ‘वीकएण्ड’ चा पुरेपूर आनंद घेतला.

दै.’देशदूत’ आयोजित इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो 2026 प्रदर्शनामध्ये सहभागी बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच घटकांना सुयोग्य पर्याय उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे नागरिक सहकुटुंब गर्दी करीत आहेत. दुपारपासून गर्दीचा ओघ रात्री 9 पर्यंत सुरू होता. स्टॉलधारकांकडून प्रदर्शनात आलेल्या कुटुंबीयांना पूरक माहिती देण्यात आली. प्रदर्शनाचे पर्यावरणीय पार्टनर पपायाज् नर्सरी हे आहेत.

उद्या रविवारी (दि.१५) प्रदर्शनाचा समारोप होत आहे. नागरिकांनी दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत इंदिरानगरमधील रथचक्र हौसिंग सोसायटीजवळील अजय मित्रमंडळ पटांगण येथे प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

याप्रसंगी दै देशदूतचे जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, सहायक जाहिरात महाव्यवस्थापक मिलिंद वैद्य, सहायक जाहिरात महाव्यवस्थापक (ग्रामीण) सचिन कापडणी, वार्ताहर किशोर चौधरी, रामदास मंडलिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर भगवंत जाधव, आनंद कदम, समीर पाराशरे, प्रशांत अहिरे, विशाल जमधडे, यांनी परिश्रम घेतले.

मान्यवरांची भेट
नगरसेवक तथा भाजप गटनेता ऍड. श्याम बङोदे, जयवंत टके, सचिन गिते, नागरिक समस्या निवारण समिती नाशिक जिल्हा अध्यक्ष संदीप जगझाप, ङाॅ.दिपीका जगझाप आदींनी एक्स्पोला हजेरी लावत विकासकांच्या स्टॉलला भेट दिली. त्यांचे स्वागत करतांना देशदूत टीम.

नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश
श्रीजी ग्रुप, सुविक बिल्डकॉन, रवी महाजन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, अनमोल नयनतारा, आनंद ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हपलपर्स, श्याम ग्रुप, श्री दत्तकृपा बिल्डर्स, दीप कन्स्ट्रक्शन, यशश्री कन्स्ट्रक्शन, संकलेचा बिल्डर्स, आदित्य डेव्हपलपर्स, आयएनडी डेव्हपलपर्स, जयप्रसाद कन्स्ट्रक्शन अँड डेव्हपलपर एलएलपी, त्रिणीती रिअल्टर्स, सचिन पी. बागड इंजिनिअर्स, बिल्डर्स अँड डेव्हपलपर्स, आशापुरी कन्स्ट्रक्शनस, आर. के. बिल्डर्स

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकारी पाण्याच्या टँकरवर आता विशेष भरारी पथकांची नजर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी जलस्त्रोत अधिगृहीत करण्याचे अधिकारी त्यात्या तालुक्याच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 30 पाण्याच्या टँकरद्वारे...