नाशिक । प्रतिनिधी Nashik
युवकांपासून व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत विविध श्रेणीतील शेकडो नागरिकांच्या भेटीचा ओघ हे ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो’च्या दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. शनिवारची सायंकाळ स्वप्नातील घराच्या शोधात घालवून नाशिकरोड आणि परिसरातील नागरिकांनी ‘वीकएण्ड’ चा पुरेपूर आनंद घेतला.
‘देशदूत’ आयोजित तसेच ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायोजित ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ मध्ये सहभागी बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच घटकांना सुयोग्य पर्याय उपलब्ध करून देत आहेत. दुपारपासून गर्दीचा ओघ रात्री ९ पर्यंत सुरू होता. स्टॉलधारकांकडून प्रदर्शनात आलेल्या कुटुंबीयांना पूरक माहिती देण्यात आली.
नाशिकरोड परिसरातील घरांचे पर्याय प्रत्यक्ष डोळ्यांत साठवता यावेत या उद्देशाने काही सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी प्रत्यक्ष ‘साईट व्हिजिट’ची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. उद्या रविवारी (दि. २) प्रदर्शनाचा समारोप होत आहे. नागरिकांनी दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रसंगी ‘देशदूत’चे जाहिरात व्यवस्थापक मिलिंद वैद्य, वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक, कॉर्पोरेट व्यवस्थापक संदीप राऊत, दिगंबर शहाणे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर आनंद कदम, भगवंत जाधव, समीर पाराशरे, विशाल जमधडे, प्रशांत अहिरे यांनी परिश्रम घेतले.
मान्यवरांच्या भेटी
शहा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संचालक अतिष शहा, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर, योगेश देशमुख, अनिल गुंजाळ, नाशिकरोड शिवजयंती उत्सव माजी अध्यक्ष विकास भागवत, शिवाजी हंडोरे, मनोज ठाकरे, पळसे ग्राम अभियान मंच अध्यक्ष प्रमोद गायधनी, नेहरा इन्व्हेस्टमेंट संचालक शीलसिंह नेहरा आणि परिवार, आदी मान्यवरांनी एक्स्पोला भेट दिली.
‘देशदूत’ प्रॉपर्टी एक्स्पोचे मुख्य प्रायोजक नाशिकरोड येथील गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम व्यवसायात कार्यरत असलेले प्रसिद्ध ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे आहेत. तसेच फायनान्शिअल पार्टनर नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक तर पर्यावरणीय पार्टनर पपायाज नर्सरी हे आहेत. सर्वांना एक्स्पोसाठी प्रवेश खुला आहे. नागरिकांनी ‘देशदूत’ आयोजित नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पोला अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











