Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAsia Cup 2025 : भारताची आज संयुक्त अरब अमिरातीशी लढत; 'असा' आहे...

Asia Cup 2025 : भारताची आज संयुक्त अरब अमिरातीशी लढत; ‘असा’ आहे दोन्ही संघांमधील रेकॉर्ड

नवी दिल्ली | New Delhi

आशिया चषक (Asia Cup 2025) क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वात यशस्वी संघ असलेल्या भारताचा (India) सामना आज (बुधवारी) संयुक्त अरब अमिरातीशी (UAE) होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता हा सामना होणार असून, सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सीक्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

भारताचे नेतृत्त्व सूर्यकुमार यादव तर संयुक्त अरब अमिरती संघाचे कर्णधारपद मोहम्मद वसीमकडे आहे. संयुक्त अरब अमिरती संघ २०१६ नंतर तब्बल ९ वर्षांनंतर आशिया चषक स्पर्धेत खेळणार आहे. आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये २ सामने खेळविण्यात आले असून, दोन्ही सामन्यात भारतीय संघाने (Team India) संयुक्त अरब अमिरती विरूध्द विजय संपादन केला आहे.

युएई संघांमध्ये ५ भारतीय वंशाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यात आर्यांश शर्मा याचा समावेश असून, तो मुळचा दिल्लीचा रहिवासी आहे. मात्र तो आता संयुक्त अरब अमिरती संघातील यष्टीरक्षक फलंदाज आहे. संयुक्त अरब अमिरतीकडून १५ टी २० सामन्यात त्याने ५ अर्धशतके झळकावली आहेत.

तसेच ध्रुव पाराशर हा देखील मुळचा दिल्लीचा रहिवासी असून,तो उजव्या हाताचा फलंदाज आहे. तर डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. तर राहुल चोप्रा हा यष्टीरक्षक फलंदाज असून अंबाला येथे त्याचा जन्म झाला होता. त्याच्याकडे २७ टी २० सामन्याचा अनुभव आहे. याशिवाय सीमरजीत सिंग हा उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज असून,ईटली संघाकडून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. त्याचबरोबर हर्षित कौशिक हा डावखुरा फलंदाज असून, तो मध्यमगती गोलंदाज देखील आहे.

दरम्यान, दुसरीकडे भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, रिंकुसिंग, तिलक वर्मा, यशस्वी जयस्वाल, जितेश शर्मा, संजू सॅमसन यांच्यावर असणार आहे. तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, अभिषेक शर्मा, शिवम दुबे हे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच गोलंदाजीत वरूण चक्रवर्ती, हर्षित राणा, अर्शदिपसिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आहेत.

आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)

9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 आणि अंतिम सामना

20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना

ताज्या बातम्या

पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ

0
पुणे | प्रतिनिधी Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात...