नवी दिल्ली | New Delhi
रायझिंग स्टार्स पुरुष आशिया चषक (Rising Stars Asia Cup) एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा थरार गुरुवार (दि.२६ नोव्हेंबर) पासून सुरुवात होत आहे. भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश हे ४ संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना कतार (Katar) येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध श्रीलंका अ संघात भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता खेळविण्यात येणार आहे.
तर थेट प्रक्षेपण सोनी लिव्ह वर करण्यात येणार आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद तिलक वर्माकडे (Tilak Varma) सोपवण्यात आले आहे. तर श्रीलंकेचे नेतृत्व पवन रथनायकेकडे सोपविण्यात आले आहे. श्रीलंकेने साखळी फेरीत हाँगकाँग, बांगलादेश, अफगाणिस्तान विरुद्ध सलग ३ सामन्यात अपराजित राहून अ गटात गुण तालिकेत अव्वल स्थान निश्चित केले आहे.
दुसरीकडे भारतीय संघाने (Team India) सलामी सामन्यात नेपाळ विरुद्ध ३०६ धावांनी दणदणीत विजय संपादन करून स्पर्धेत शानदार सुरुवात केली होती. मात्र, रविवार (दि.२२ नोव्हेंबर) रोजी पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध ४८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर मंगळवारी संयुक्त अरब अमीरतीविरुद्ध ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवून भारतीय संघाने दणदणीत विजय संपादन करून उपांत्य फेरीच्या शर्यतीत आव्हान कायम राखले होते.
मात्र पाकिस्तानने नेपाळ विरुद्ध ९६ धावांनी दणदणीत विजय (Won) संपादन केल्यामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला होता. विशेष म्हणजे साखळी फेरीत अपराजित असलेला श्रीलंका संघ आपली आगेकूच कायम राखण्यासाठी उत्सुक असेल. तर संयुक्त अरब अमितविरूद्ध ५३ चेंडूत २०४ धावांची ऐतिहासिक खेळी साकारून भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, उपकर्णधार रिंकूसिंग कडून मोठी खेळी भारतीय समर्थकांना अपेक्षित असणार आहे. गोलंदाजीत अर्शद खान, हर्षित राणा, प्रिंस यादव सर्व गोलंदाजांकडून सातत्यपूर्ण कामगिरी अपेक्षित असेल.




