Thursday, May 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIND vs ENG 3rd Test : लॉर्ड्स कसोटी निर्णायक वळणावर; भारताला विजयासाठी...

IND vs ENG 3rd Test : लॉर्ड्स कसोटी निर्णायक वळणावर; भारताला विजयासाठी १३५ धावांची गरज, इंग्लंडचा फ्लॉप शो

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

लॉर्डस येथील मैदानावर (Loard Ground) भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात कसोटी मालिकेतील (Test Serais) तिसरा सामना सुरू आहे. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला दुसऱ्या डावात १९२ धावांत गुंडाळून सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. वॉशिग्टन सुंदरने ४ खेळाडूंना बाद करून इंग्लंडच्या फलंदाजीतील हवा काढून घेतली. सिराज आणि बुमराह यांनी २-२ बळी मिळवून सुरेख साथ दिली.

- Advertisement -

इंग्लंडने दिलेल्या १९३ धावांचा पाठलाग करताना दिवसाअखेर भारताने (India) ४ गडी बाद ५८ धावांपर्यंत मजल मारली, यशस्वी जयस्वाल (०) आर्चरने स्मिथकडे झेल देण्यास भाग पाडले, तर करूण नायरला (१४) तर कर्णधार शुभम गिल ६ धावांवर कर्सने पायचित पकडले, नाईट वॉचमन म्हणून आलेला आकाशदीप (१) धाव काढून बाद झाला. के. एल. राहुल ३३ धावांवर खेळत आहे.

भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करीत इंग्लंडला (England) दुसऱ्या डावात ६२.१ ओव्हरमध्ये १९२ धावांवर गुंडाळले. त्यामुळे भारताला २०० पेक्षा कमी धावांचे लक्ष्य मिळाले. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी भारताकडे १०० पेक्षा अधिक षटके आहेत. आता हा सामना भारतीय संघ किती गडी राखून जिंकतो, याची क्रिकेटप्रेमींना आतुरता असणार आहे. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यापुढे इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. इंग्लंडसाठी अनुभवी फलंदाज जो रुटने सर्वाधिक ४० धावा केल्या. त्याखेरीज एकही फलंदाजांवर मोठी मजल मारता आली नाही.

दरम्यान, कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) ३३ धावांची खेळी केली. हॅरी ब्रूकने २३ धावा केल्या. सलामीवीर जॉक क्रॉलीने २२ धावा केल्या, बेन डकेटने १२ तर ख्रिस वोक्सने १० धावा केल्या. इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताकडून एकूण ६ जणांनी गोलंदाजी केली. रवींद्र जडेजा वगळता सर्वांना बळी मिळवले. फिरकीपटू बॉशिंग्टन सुंदरने कमाल केली. सुंदरने नावाप्रमाणे सुंदर कामगिरी केली. सुंदरने १२.१ ओव्हरमध्ये २२ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २-२ फलंदाज बाद केले, नितीश कुमार रेड्डी आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी एकेक खेळाडूला माघारी धाडले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...