Tuesday, May 5, 2026
Homeक्रीडाIND vs NZ Final : टी-२० चा विश्वविजेता कोण? भारत-न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादमध्ये...

IND vs NZ Final : टी-२० चा विश्वविजेता कोण? भारत-न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादमध्ये आज महासंग्राम

नवी दिल्ली | New Delhi

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ चा जेतेपदाचा सामना रविवारी (दि.८) अहमदाबादच्या ऐतिहासिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड (India-New Zealand) यांच्यात खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता या हायव्होल्टेज लढतीला सुरुवात होईल.

- Advertisement -

सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. विशेष म्हणजे, टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही संघाला सलग दोनदा जेतेपद मिळवता आलेले नाही तसेच यजमान देशालाही घरच्या मैदानावर चषक उंचावता आलेला नाही. हा दुहेरी इतिहास रचण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे.

आकडेवारी काय सांगते ?

विश्वचषकातील संघर्ष विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड तीन वेळा आमनेसामने आले आहेत; परंतु भारताला अद्याप किवींविरुद्ध पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.
टी-२० एकूण रेकॉर्ड आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताचे पारडे जड आहे. ३० सामन्यांपैकी भारताने १८ तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. तर १ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा १६८ धावांनी धुव्वा उडवला होता.

रिंकू, कुलदीपची एन्ट्री ?

अंतिम सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याच्या जागी फिनिशर रिंकू सिंहला संधी देऊन फलंदाजी मजबूत केली जाऊ शकते. गेल्या सामन्यात ६४ धावा खर्च करून महागडा ठरलेला वरुण चक्रवर्ती संघाबाहेर जाऊ शकतो. त्याच्या जागी अनुभवी कुलदीप यादवला फिरकीची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे.

सँटनरचे माईंड गेम आणि डेल स्टेनचे भाकित

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने अंतिम सामन्यापूर्वी मानसिक दडपण वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणाला, ट्रॉफी जिंकण्यासाठी अब्जावधी भारतीय चाहत्यांची मने तोडावी लागली तरी आम्हाला हरकत नाही. घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे भारतावर विजयाचा जास्त दबाव असेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने किवींना सावध केले आहे. तो म्हणाला की, जर न्यूझीलंड हा सामना हरला तर चोकर्स हा टॅग आता त्यांच्या नावावर लागू शकतो.

पाऊस पडला तर काय?

सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता कमी असली तरी आयसीसीने खबरदारी म्हणून नियम स्पष्ट केले आहेत. राखीव दिवस : जर ८ मार्चला सामना पूर्ण झाला नाही, तर ९ मार्च हा दिवस राखीव दिवस असेल.

अतिरिक्त वेळ : नियोजित दिवशी ९० मिनिटे आणि राखीव दिवशी १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे.

संयुक्त विजेता : जर राखीव दिवशीही खेळ झाला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

भारताची संभाव्य प्लेईंग – संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह.

प्रमुख खेळाडूंकडे लक्ष : सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, फिन अॅलन आणि टीम सायफर्ट यांच्या कामगिरीवर सामन्याचा निकाल अवलंबून असेल.

ताज्या बातम्या