मुंबई | Mumbai
रायझिंग स्टार पुरुष आशिया चषक (Rising Stars Asia Cup 2026) क्रिकेट स्पर्धेत आज (मंगळवार दि. २४ नोव्हेंबर) रोजी भारतीय संघाचा (Team India) सामना संयुक्त अरब अमिराती (यूएई) सोबत होणार आहे. हा सामना युनिव्हर्सिटी ऑफ दोहा सायन्स अँड टेक्नॉलॉजी मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:३० वाजता सुरू होईल. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व तिलक वर्मा करणार आहेत.
सलामीच्या सामन्यात नेपाळविरुद्ध (Nepal) ३०६ धावांनी दणदणीत विजय मिळवत भारताने स्पर्धेत शानदार सुरुवात केली होती. मात्र, रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ४८ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने उपांत्य फेरीतील आपले आव्हान कायम राखण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणे अनिवार्य ठरले आहे.
सरस नेट रनरेट भारताची जमेची बाजू
उपांत्य फेरीच्या शर्यतीत भारतासाठी सर्वोत्तम जमेची बाजू म्हणजे त्यांचा सरस नेट रनरेट आहे. दुसरीकडे, संयुक्त अरब अमिराती संघाचे उपांत्य फेरीतील आव्हान आधीच संपुष्टात आले असले, तरी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत गाफील राहून चालणार नाही, असे चित्र आहे.




