Tuesday, November 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका बुधवारपासून; शुभमन गिलच्या...

IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका बुधवारपासून; शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात

नवी दिल्ली | New Delhi

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पाच एकदिवसीय (ODI) सामन्यांच्या मालिकेला बुधवार (दि.४ नोव्हेंबर)पासून ऑकलंड येथील ईडन पार्क मैदानावर प्रारंभ होत आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेतील विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असून, एकदिवसीय मालिकेतही ही विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. भारतीय वेळेनुसार (Team India) मालिकेतील सर्व सामने सकाळी ७:३० वाजता सुरू होतील. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘सोनी टेन’ आणि ‘सोनी लीव्ह’वर केले जाणार आहे.

- Advertisement -

भारताचे कर्णधारपद शुभमन गिलकडे,न्यूझीलंडची धुरा सँटनरकडे

मालिकेतील (Seires) पहिल्या ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद शुभमन गिल सांभाळणार असून, त्यानंतर तो कसोटी मालिकेच्या तयारीसाठी संघातून बाहेर पडेल. शेवटच्या दोन सामन्यांत श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर ईशान किशन उपकर्णधार असेल. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाची धुरा मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यापूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध परदेशात एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत; मात्र भारताला अद्याप परदेशात मालिका विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे ही मालिका जिंकण्याचे मोठे आव्हान गिलसमोर असेल.

दोन्ही संघांना दुखापतीचे ग्रहण

भारताचा जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला असून, त्याच्याजागी आकिब नाबीला संघात संधी देण्यात आली आहे. याशिवाय, अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी केवळ पहिल्या सामन्यात उपलब्ध असणार आहे. तर न्यूझीलंडच्या संघालाही दुखापतींचे मोठे ग्रहण लागले आहे. अष्टपैलू रचिन रवींद्र (खांद्याची दुखापत) आणि मार्क चॅपमन (डाव्या पायाची हॅमस्ट्रिंग दुखापत) मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी टीम सायफर्ट, हेन्री निकोल्स आणि डीन फॉक्सक्रॉफ्ट यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

फलंदाजी व गोलंदाजीची मदार

भारतीय फलंदाजीची मुख्य भिस्त रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यावर असेल. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, नितीश रेड्डी आणि गुरनुर ब्रार संघात आहेत. याशिवाय गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, यश ठाकूर, आकिब नाबी, गुरनुर ब्रार, अंशुल कंबोज आणि नमन धीर यांच्यावर जबाबदारी असणार आहे.

आमनेसामने आकडेवारी काय सांगते?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण १२३ सामने खेळविण्यात आले असून, यात भारताने ६३ सामन्यांत विजय मिळविला आहे. तसेच न्यूझीलंडने ५२ सामने जिंकले असून, एक सामना टाय झाला आहे. तर ७ सामने रद्द झाले आहेत. याशिवाय न्यूझीलंडमध्ये ४५ सामने खेळले गेले असून, यात भारताने १४ तर न्यूझीलंडने २६ सामन्यांत विजय मिळविला आहे. ऑकलंड मैदानावर ९ सामने खेळले गेले असून, भारताने ४ सामने जिंकले आहेत. तर ४ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिकमध्ये बेफिकीर चालकांची खैर नाही! शहरात एकाच महिन्यात...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या बेफिकीर चालकांमुळे होणारे प्राणघातक अपघात (Accident) रोखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) सुरू केलेल्या...