Wednesday, May 20, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू लढत;...

IPL 2026 : आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू लढत; कोण मारणार बाजी?

मुंबई | Mumbai

आज आयपीएलमध्ये (IPL) बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द लखनौ सुपर जायंट्समध्ये (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) सामना खेळविण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सामना खेळविण्यात येणार आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघामध्ये बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर २ सामने खेळले गेले असून, दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकला आहे. तसेच आयपीएल स्पर्धेमध्ये ६ सामने खेळले असून, बंगळूरुचा संघ ४-२ फरकाने आघाडीवर आहे.

- Advertisement -

बंगळूरुने अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला पराभूत केले आहे. तर गुजरात टायटन्स विरूध्द लखनौ सुपर जायंट्स संघाला पराभवाची धूळ चाखावी लागली होती. त्यामुळे स्पर्धेतील आपला चौथा विजय संपादन करण्याची संधी बंगळूरु संघाकडे असणार आहे. तर विजयी हॅट्रिक संपादन करण्याच्या इराद्याने लखनौ सुपर जायंट्स मैदानावर उतरणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात बंगळूरु संघाने आपल्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभूत केले आहे. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानावर तिसऱ्यांदा विजय संपादन करण्यासाठी बंगळूरु संघाचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान, सलामीवीर फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला ताबडतोब मैदानाबाहेर पडावे लागले होते. विराट कोहलीला झालेली दुखापत गंभीर नसल्यामुळे तो लखनौ सुपर जायंट्स विरूध्द संघात परतण्याची दाट शक्यता आहे. आजच्या सामन्यात मिचेल मार्श, फील सॉल्ट, रजत पाटीदार, रिषभ पंत या खेळाडूंवर नजर असणार आहे.

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...