Thursday, May 21, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : राजस्थानसमोर पंजाबचे आव्हान; कोण मारणार बाजी?

IPL 2026 : राजस्थानसमोर पंजाबचे आव्हान; कोण मारणार बाजी?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये यंदाच्या हंगामात अपराजित राहिलेल्या पंजाब किंग्ज समोर मंगळवारी (दि. २८) राजस्थान रॉयल्सचे आव्हान (Punjab Kings and Rajasthan Royals) असणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सामना खेळविण्यात येणार आहे. हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादव वेंद्रसिंग न्यू चंदीगड मैदानावर खेळविण्यात येणार आहे. पंजाब किंग्जचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे तर रियान परागकडे राजस्थान रॉयल्सची धुरा सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

राजस्थान रॉयल्स संघाला अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे पंजाब किंग्ज संघाला पराभूत करून स्पर्धेतील आपला सहावा विजय संपादन करण्याची संधी राजस्थान रॉयल्सकडे असणार आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जने अखेरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. त्यामुळे आपली विजयी लय कायम राखण्यासाठी पंजाब किंग्ज मैदानावर उतरणार आहे.

आयपीएल (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ३० सामने खेळले गेले असून, राजस्थान रॉयल्सने १७-१३ फरकाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अखेरच्या ५ सामन्यांचा निकाल पाहिल्यास पंजाब किंग्जने ३-२ फरकाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. न्यू चंदीगड मैदानावर राजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्जमध्ये दुसऱ्यांदा सामना (Match) खेळविण्यात येणार आहे. १३ एप्रिल २०२४ रोजी अखेरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्ज संघाला ३ गडी राखून पराभूत केले होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा पोलीस दलातील पाच अधिकार्‍यांना पदोन्नती

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्य पोलीस दलातील पदोन्नतीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून राज्यभरातील 77 सहायक पोलीस निरीक्षकांना (एपीआय) पोलीस निरीक्षक (पीआय) पदावर, तर 488 पोलीस...