Tuesday, April 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2026 : दिल्ली कॅपिटल्स विजयी हॅट्रिकसाठी सज्ज; गुजरात टायटन्सशी भिडणार

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्स विजयी हॅट्रिकसाठी सज्ज; गुजरात टायटन्सशी भिडणार

नवी दिल्ली | New Delhi

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेमध्ये आज (बुधवारी) नवी दिल्ली (New Delhi) येथील अरूण जेटली मैदानावर दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना गुजरात टायटन्स विरूध्द होणार आहे. गुजरात टायटन्स संघाने आयपीएल स्पर्धेमध्ये पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स विरूध्द पराभवाचा सामना केला आहे. त्यामुळे सलग तिसरा पराभव टाळून विजयी मार्गावर परतण्यासाठी गुजरात टायटन्स सज्ज असणार आहे.

- Advertisement -

दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद अक्षर पटेलकडे (Akshar Patel) असणार आहे. तर शुभमन गिल (Shubhman Gill) गुजरात टायटन्सचे कर्णधारपद भूषविणार आहे.भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सामना खेळविण्यात येणार आहे.आयपीएल स्पर्धेमध्ये ६ सामने खेळले असून, दोन्ही संघांनी ३-३ विजय संपादन केला आहे.

दरम्यान, नवी दिल्ली येथे २ सामने खेळले असून, दोन्ही संघांनी १-१ विजय संपादन केला आहे. सलामीच्या दोन्ही सामन्यात विजय संपादन केल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आजच्या सामन्यात रशीद खान, शुभमन गिल, अक्षर पटेल, कुलदीप यादव या प्रमुख खेळाडूंवर लक्ष असणार आहे.

ताज्या बातम्या

मिलिंद

खासदारकीची भीक मागणारा, लाचारी, मुर्खपणा आणि अज्ञान…; काँग्रेसने मिलिंद देवरांना एका...

0
मुंबई | Mumbaiज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या पार्थिवावर सायंकाळी 5 वाजता मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील दिग्गज...