Wednesday, May 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2026 : दिल्ली-हैदराबादमध्ये आज 'कांटे की टक्कर'; विजयाची लय कायम राखण्याचे...

IPL 2026 : दिल्ली-हैदराबादमध्ये आज ‘कांटे की टक्कर’; विजयाची लय कायम राखण्याचे दोन्ही संघांसमोर आव्हान

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये मंगळवारी (दि.२१) येथील श्री राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्स (Sunrisers Hyderabad and Delhi Capitals) संघाशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सामना खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

दिल्ली कॅपिटल्सने अखेरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला पराभूत केले आहे. तर सनरायझर्स हैदराबादने अखेरच्या सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत केले आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये २६ सामने खेळले गेले असून, सनरायझर्स हैदराबादने १३-१२ फरकाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.

हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सहा सामने खेळले असून, दोन्ही संघांनी ३-३ सामन्यात विजय (Won) संपादन केला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद अष्टपैलू अक्षर पटेलकडे असणार आहे. तर सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात आपला चौथा विजय संपादन करून अंतिम ४ मध्ये आपला दावा मजबूत करण्यासाठी दोन्ही संघांमध्ये एक चुरशीची लढत क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

प्रमुख खेळाडू : अक्षर पटेल, के एल राहुल, अभिषेक शर्मा, ईशान किशन.

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...