Thursday, April 16, 2026
Homeक्रीडाIPL 2026 : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स-पंजाब किंग्ज आमनेसामने; रोहित शर्मा सामन्यातून...

IPL 2026 : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स-पंजाब किंग्ज आमनेसामने; रोहित शर्मा सामन्यातून बाहेर?

मुंबई | Mumbai

इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये (IPL) आज (गुरुवारी) मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरूध्द मुंबई इंडियन्स संघामध्ये (Mumbai Indians and Punjab Kings) सामना होणार आहे. सायंकाळी ७:३० वाजता सामना खेळविण्यात येणार असून, मुंबईचे कर्णधारपद हार्दिक पांड्या (Hardik Pandya) तर पंजाब किंग्जचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे असणार आहे.

- Advertisement -

यंदाच्या हंगामात पंजाब किंग्जने ४ सामने खेळले असून, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स विरूध्द विजय संपादन केला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पंजाब किंग्ज संघाच्या खात्यात ७ गुण जमा असून, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. तर मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करून स्पर्धेतील आपला चौथा विजय (Won) संपादन करण्याची संधी पंजाबकडे असणार आहे.

दुसरीकडे मुंबई इंडियन्सने सलामीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द विजय संपादन केला आहे. तर राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स विरूध्द सलग ३ सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे बाद फेरीच्या लढतीत आपले आव्हान कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्सला विजय अनिवार्य असणार आहे.दरम्यान पंजाब किंग्ज विरूध्द लढतीपूर्वी मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जमध्ये ३४ सामने खेळले गेले असून, दोन्ही संघांनी १७-१७ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर अखेरच्या ५ सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास पंजाब किंग्जने ३ तर मुंबई इंडियन्सने २ सामन्यात विजय संपादन केला आहे. वानखेडे स्टेडियमवर ११ सामने खेळले असून, पंजाब किंग्जने ६-५ फरकाने सरशी साधली आहे.

रोहित शर्मा आजच्या सामन्यातून बाहेर?

मुंबईचा माजी कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतग्रस्त असल्यामुळे तो आजचा सामना खेळवण्याची शक्यता कमी आहे. बंगळूरु विरूद्धच्या लढतीवेळी त्याला दुसऱ्या डावात फलंदाजी करताना हॅमस्ट्रिंग दुखापतीचा सामना करावा लागला होता. रोहित शर्मा आजच्या सामन्यात खेळू न शकल्यास क्विंटन डिंकाॅक सलामीला खेळू शकतो. त्यामुळे जर क्विंटन डिंकाॅक आणि रायन रिकलटनने सलामी दिली तर ४ परदेशी खेळाडू कोण? असा पेच मुंबईपुढे निर्माण होऊ शकतो.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : पोलिसांना ‘कल्पना’च नाही ! खरातची पत्नी दोन...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचा आरोप असलेला संशयित अशोक खरात (Ashok Kharat) उर्फ कॅप्टन याच्या गुन्ह्यांमध्ये आता त्याची पत्नी...