Saturday, September 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2026 : लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आज भिडणार;आतापर्यंत कोण...

IPL 2026 : लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आज भिडणार;आतापर्यंत कोण ठरलंय वरचढ?

नवी दिल्ली | New Delhi

आयपीएलमध्ये (IPL) आज (बुधवारी)लखनौ सुपर जायंट्स संघासमोर दिल्ली कॅपिटल्सचे (Lucknow Super Giants vs Delhi Capitals) आव्हान असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. दोन्ही संघांमध्ये रंगलेल्या अखेरच्या ५ सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास लखनौ सुपर जायंट्सने ३-२ आशा फरकाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच एकाना मैदानावर २ सामने खेळले असून, दोन्ही संघांनी १-१ विजय मिळवला आहे.

- Advertisement -

आयपीएल स्पर्धेमध्ये ७ सामने खेळले असून, दिल्ली कॅपिटल्स ४-३ आशा फरकाने आघाडीवर आहे. लखनौ सुपर जायंट्सचे कर्णधारपद यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतकडे (Rishabh Pant) सोपविण्यात आले आहे. तर अक्षर पटेलकडे दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद असणार आहे. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्स संघाचा लेफ्ट आर्म पेसर मिचेल स्टार्क सुरवातीच्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याची उणीव भरून काढणे हे दिल्ली कॅपिटल्ससमोर मोठे आव्हान असणार आहे. तसेच यंदाच्या वर्षी अॅनरिक नॉरकिया, मोहम्मद शमी, अर्जुन तेंडुलकर,वनिंदू हसरंगा,जॉश इंग्लिश हे खेळाडू नव्याने संघात दाखल झाले असून, लखनौ सुपर जायंट्स संघाच्या फलंदाजीवर नजर टाकल्यास निकोलस पूरण, अॅडम मार्करम, मिचेल मार्श यांसारख्या आक्रमक फलंदाजांचा संघात समावेश आहे.

दरम्यान, गोलंदाजीत मोहम्मद शमी, वनिंदू हसरंगा,आवेश खान, मोहसीन खान हे पर्याय उपलब्ध आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाकडे के एल राहुल, डेव्हिड मिलर, पथूम निसांका, पृथ्वी शॉ यांच्यावर फलंदाजी अवलंबून असेल. गोलंदाजीत अक्षर पटेल, कुलदीप यादव, काईल जेमिसन, माधव तिवारी, टी नटराजन,दुषमंता चमिरा, विप्राज निगम,मुकेश कुमार असून, आयपीएल स्पर्धेमध्ये विजयी सलामी देण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असणार आहेत.

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...