मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचा १९ वा हंगाम सध्या सुरू असून, स्पर्धा आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बाद फेरीची शर्यत अधिक रंगतदार झाली आहे. आज (बुधवार) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad ) सामना खेळविण्यात येणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद पॅट कमिन्सकडे तर हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद असणार आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स (MI) संघांसाठी बाद फेरीचा मार्ग अधिक खडतर झाला आहे.उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला ७ पैकी ५ सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे. तसेच इतर संघाच्या निकालावर नजर ठेवावी लागणार आहे. सनरायझर्स हैदराबादने यंदाच्या हंगामात चमकदार केली आहे.
सनरायझर्स हैदराबादने ८ सामने खेळले असून, ५ सामन्यात विजय (Won) संपादन केला आहे. तर ३ सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करून विजयी षटकार मारण्याची संधी सनरायझर्स हैदराबादकडे असणार आहे. आयपीएल स्पर्धेमध्ये २५ सामने खेळले गेले असून, मुंबई इंडियन्सने १५-१० फरकाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच वानखेडे स्टेडियमवर ८ सामने खेळले असून ५-२ फरकाने मुंबई इंडियन्स संघाचा वरचष्मा राहिला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात पंजाब किंग्ज, चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द मुंबई इंडियन्स संघाला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द एकमेव सामना मुंबई इंडियन्सने जिंकला आहे.
प्रमुख खेळाडू : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, सूर्य कुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन





