मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा थरार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. मंगळवारी (दि.१२) अहमदाबादच्या ऐतिहासिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) यजमान गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (GT vs SRH) यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. गुणतालिकेत अव्वलस्थानी राहण्यासाठी आणि प्ले-ऑफमधील आपले स्थान अधिकृतपणे निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे.
गुणतालिकेवर (Points Table) सध्याच्या नजर टाकल्यास दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी १४ गुण आहेत. मात्र, सरस नेट रनरेटच्या जोरावर पॅट कमिन्सचा सनरायझर्स हैदराबाद संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे, तर शुभमन गिलचा गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानावर आहे. मंगळवारच्या सामन्यातील विजय एका संघाला थेट बाद फेरीचे तिकीट मिळवून देऊ शकतो. मैदानावर अभिषेक शर्मा, शुभमन गिल, कगिसो रबाडा, रशीद खान या प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
दोन्ही संघांचा फॉर्म
आपल्या मागील सामन्यात पंजाब किंग्जला धूळ चारली आहे, तर गुजरातने बलाढ्य राजस्थान दोन्ही सघ विजयाचा आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरणार आहेत. हैदराबादने रॉयल्सवर विजय मिळवला आहे.
आकडेवारी काय सांगते?
इतिहास पाहता गुजरात टायटन्सचे पारडे जड दिसते.
आमनेसामने : दोन्ही संघात आतापर्यंत ७ सामने झाले असून गुजरातने ५ वेळा बाजी मारली आहे, तर हैदराबादला केवळ १ विजय मिळवता आला आहे.
मैदानाचा रेकॉर्ड : अहमदाबादच्या मैदानावर झालेले तिन्ही सामने गुजरातने जिंकले आहेत. हैदराबादला या मैदानावर अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही.




