अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळील गरवारे चौकात बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (29 जुलै) पहाटे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गौरव केशव मोडवे (वय 24) आणि भारत रामनाथ धनवटे (वय 40, दोघेही रा. देहरे, ता. अहिल्यानगर) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौरव मोडवे व भारत धरवटे हे त्यांच्या दुचाकीवरून अहिल्यानगर- मनमाड रस्त्याने एमआयडीसी येथील कंपनीत नाईट ड्यूटीसाठी जात होते. पहाटे एक वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाणे जवळील गरवारे चौकात वळण घेताना मनमाडकडून अहिल्यानगरच्या दिशेने येणार्या बसने दुचाकीला जोरदार धडक झाली.
या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शासकीय रूग्णालयातून मिळालेल्या वैद्यकीय माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.




