Thursday, September 10, 2026
Homeक्राईमCrime News : एस.टी. चालकाला प्रवाशाची मारहाण; गुन्हा दाखल

Crime News : एस.टी. चालकाला प्रवाशाची मारहाण; गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

येथील स्वस्तिक बसस्थानक येथे एका एस. टी. चालकावर प्रवाशाकडून शिवीगाळ व मारहाणीची घटना सोमवारी (25 ऑगस्ट) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अंबादास अजिनाथ राख (वय 34, रा. हाजीपुर, ता. आष्टी, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. मंगेश भरत खाकाळ (रा. आंबिलवाडी, ता. अहिल्यानगर) व त्याच्या साथीदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अंबादास राख हे एस.टी. महामंडळात गेल्या 10 वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी 7.15 वाजता ते एस.टी. (एमएच14 एच 0855) या बसवर राजगुरूनगर ते पैठण या मार्गावर ड्युटीवर होते. या बसवर अंकुश जनार्धनराव शेंडगे (वाहक) देखील ड्युटीवर होते. संध्याकाळी पैठणहून परतीच्या प्रवासात बस स्वस्तिक बसस्थानक येथे आल्यानंतर दोन प्रवाशांनी बसमध्ये जागा आहे का, अशी चौकशी केली. जागा नसल्याचे सांगितल्यावर ते प्रवासी खाली उतरले. याच दरम्यान त्यांचा मित्र मंगेश खाकाळ बसमध्ये चढला व चालकाला शिवीगाळ करू लागला.

चालक राख यांनी त्याला समजावून सांगितले असता तु बसमधून खाली उतर, मग पाहतो असे म्हणत त्याला बाहेर बोलावले. चालकाने नाव विचारल्यावर मी मंगेश भरत खाकाळ, मला कोणाचा धाक नाही, तुझी आज विकेट टाकतो असे म्हणत धमकी दिली. त्यानंतर त्याने शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीमध्ये चालकाच्या शर्टचे बटण तुटले. वाहक शेंडगे यांनी हस्तक्षेप केला असता त्यालाही शिवीगाळ करण्यात आली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला असून संशयित आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

MPSC Exam : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली;...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६' च्या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे.पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार २५...