Wednesday, January 15, 2025
Homeजळगावएस.टी.बस ट्रॅक्टरवर धडकली ; एकाचा जागीच मृत्यू ; २१ प्रवासी जखमी

एस.टी.बस ट्रॅक्टरवर धडकली ; एकाचा जागीच मृत्यू ; २१ प्रवासी जखमी

धरणगाव – प्रतिनिधी

धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे काल दि.१३ रोजी बस अपघात होऊन २८ प्रवासी जखमी झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा शनिवारी सकाळी धरणगाव-चोपडा रोडवर असलेल्या पिंपळे फाट्याजवळ बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १ ठार आणि २१ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

धरणगाव आणि चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळील फाट्याजवळ शनिवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभे असलेल्या एका ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ ईजी ३९५२) ला धरणगाव चोपडा मार्गे जाणारी जळगाव शिरपूर बस क्रमांक (एमएच १४ बीटी ३९१०) ने मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली.

हा अपघात इतका भीषण होता की, बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात प्रताप विद्या मंदिर, प्राथमिक विभाग, चोपडा शाळेतील उपशिक्षक तामराज शरद सोनवणे (४८वर्षे) जागीच ठार झाले तर बसमधली २१ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. यातील बसचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या