Wednesday, May 6, 2026
Homeराजकीयमोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला; आयुक्त दिनेश वाघमारेंनी दिली...

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला; आयुक्त दिनेश वाघमारेंनी दिली महत्वाची माहिती

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका (Local Body Election) कधी होणार याकडे प्रत्येक पक्षातील नेत्यांसह इच्छुकांचे लक्ष लागून आहे. अशातच आता राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. आज नाशिक विभागातील आगामी निवडणुकांबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती दिली.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, महापालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम आखण्यात येणार आहे. नाशिक विभागात एकूण ५० लाख ४५ हजार मतदार असून ४,९८२ मतदान केंद्रे आहेत. यासाठी ८,७०५ कंट्रोल युनिट्स लागणार असून, १७ हजार पेक्षा अधिक मतदान यंत्रांची आवश्यकता आहे” असे वाघमारे यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “या सर्व निवडणुका (Election) एकत्र घेतल्यास मनुष्यबळाची मोठी अडचण येणार आहे. त्यामुळे निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्रथम कोणत्या संस्थेची निवडणूक होणार, हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. साधारणता ही निवडणूक चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदान याद्या विभाजित केल्या जातील”, असेही दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, “०१ जुलैपर्यंत मतदार यादीत जे नाव असेल ते गृहीत धरून मतदार निश्चित होतील. कुठले मतदार निश्चित करायचे आणि कुठले काढून टाकायचे याचे अधिकार निवडणूक आयोगाला नाही. प्रभार रचना २०११ पर्यंत झालेल्या जनगणनेनुसार झालेली आहे. ओबीसी आरक्षण लॉटरी पद्धत अवलंबली जाणार आहे. निवडणूक कधी लागेल हे आज सांगता येत नाही. मात्र, दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे”, असेही दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर होणार नाही

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्रे वापरण्यात येणार नाहीत. कारण व्हीव्हीपॅट वापरण्यात मोठा वेळ जातो. तसेच लोक देखील ईव्हीएमबाबत शंका घेतात. भविष्यात व्हीव्हीपॅटच्या प्रक्रियेत बदल झाला तर तसा बदल करण्यात येईल, असेही राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले.

ताज्या बातम्या

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ओझर विमानतळावर आगमन व स्वागत

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज रात्री सव्वानऊच्या सुमारास ओझर विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम...