जळगाव jalgaon । प्रतिनिधी
नाशिक परिक्षेत्राचे Deputy Inspector General of Police पोलीस उपमहानिरिक्षक बी.जी. शेखर B.G. Shekhar हे शनिवार, 4 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात आले आहेत. नाशिक परिक्षेत्राचा पदभार घेतल्यानंतर शेखर शनिवारी प्रथमच जळगाव दौर्यावर आले. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंगलम सभागृहात त्यांनी जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांमधील कर्मचार्यांची बैठक Meeting घेवून Review घेतला.
कर्तव्याची जाणीव करुन देतांनाच कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहण्यासाठी खबर्यांचे नेटवर्क तयार करावे अशा सुचनाही अधिकारी कर्मचार्यांना यावेळी दिल्या.
पोलीस उपमहानिरिक्षक बी.जी. शेखर यांनी मंगलम सभागृहात जिल्ह्यातील 35 पोलीस ठाण्यांमधील गोपनीयचे अंमलदार व जिल्हा विशेष शाखेचे अधिकारी, अमलदार यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व सचिन गोरे व्यासपीठावर होते.
दुपार सत्रात त्यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकार्यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीचा आढावा घेतला. आगामी गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगार, उपद्रवी तसेच गणेशोत्सवाच्या मागील काळात रेकॉर्डवर आलेल्यांवर विशेष नजर ठेवण्यासह कोणत्याही किरकोळ घटनांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, त्यासाठी पोलिसांनी 24 तास अलर्ट रहावे अशा सूचना नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी शनिवारी बैठकीत पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना दिल्या.
आज भुसावळ, रावेरात साधणार संवाद
हा विभाग पोलीस दलाचे नाक, कान व डोळे याची भूमिका बजावणारा महत्वाचा व संवेदनशील आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक हालचाल ही गोपनीय विभागाला मिळालीच पाहिजे, त्यासाठी प्रत्येकाने खबर्यांचे नेटवर्क तयार करावे. त्यामुळे पोलीस दलाला घटनेपूर्वीच पाऊले उचलणे शक्य होवून अनुचित घटना टाळता येते असेही ते म्हणाले.
आपल्या कार्यक्षेत्राची माहिती तयार ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. रावेर व भुसावळ या अती संवेदनशील शहरात बी.जी.शेखर रविवार, 5 सप्टेंबर रोजी थेट जनता व मोहल्ला कमिटीव्दारे संवाद साधणार आहेत. सर्वात आधी 11 वाजता रावेर येथे बैठक घेणार आहेत त्यानंतर दुपारी भुसावळात बैठक होणार आहे.