Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमAhilyanagar : स्टोन क्रशरसाठी 48.76 लाखांची वीजचोरी

Ahilyanagar : स्टोन क्रशरसाठी 48.76 लाखांची वीजचोरी

भरारी पथकाच्या तपासणीत अरणगावमध्ये प्रकार उघड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तालुक्यातील अरणगाव शिवारात स्टोन क्रशरमध्ये वीजचोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीला तब्बल 48 लाख 76 हजार 923 रूपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या भरारी पथक, कल्याण (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता उमेश पंडित घुगे (वय 42, रा. कल्याण) यांनी सोमवारी (20 एप्रिल) तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

- Advertisement -

त्यानुसार भैरवनाथ स्टोन क्रेशरचे पोपट गुलाब शिंदे (रा. अरणगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घुगे यांनी पथकासह 11 मार्च 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अरणगाव येथील सर्वे क्रमांक 371 मधील भैरवनाथ स्टोन क्रशर येथे केलेल्या पाहणीत अनधिकृतरित्या वीज वापर होत असल्याचे आढळून आले. पथकाने अधिक तपास केला असता, एकूण 48 लाख 76 हजार 923 रूपयांची 2 लाख 85 हजार 299 युनिट वीज चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी उमेश घुगे यांनी 20 एप्रिल 2026 रोजी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोपट गुलाब शिंदे याच्याविरूध्द भारतीय विद्युत अधिनियम सुधारणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालेगावातही 22 लाखांची वीजचोरी
अतिरिक्त कार्यकारी अभियंता उमेश घुगे यांच्या पथकाने अहिल्यानगर शहरातील नालेगाव परिसरात आदित्य इंडस्ट्रीज येथे तपासणी केली असता तेथे देखील वीजचोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात घुगे यांनी 20 एप्रिल रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विजय शिवाजी शिंदे (रा. नालेगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने तब्बल 16 महिन्यांच्या कालावधीत एक लाख 22 हजार 243 युनिट वीज चोरी करून सुमारे 22 लाख 71 हजार 270 रूपयांचे नुकसान केल्याचे समोर आले आहे. संशयिताने चोरीची रक्कम काही प्रमाणात भरली असली, तरी तडजोडीची आठ लाख रूपयांची रक्कम न भरल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Sanchita Ugale : चित्रपटसृष्टीत मानसिक छळ? संचिता उगले मृत्यू प्रकरणात धक्कादायक...

0
मुंबई । Mumbai 'कुमकुम भाग्य', 'वागले की दुनिया' यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि अभिनेता विक्की कौशलसोबत स्क्रीन शेअर करणारी अत्यंत प्रतिभावान व तरुण अभिनेत्री संचिता उगले...