Friday, July 24, 2026
Homeक्राईमCrime News : पूर्ववैमनस्यातून दगडफेक करत मारहाण

Crime News : पूर्ववैमनस्यातून दगडफेक करत मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जुन्या भांडणाची कुरापत काढून गुंडेगाव येथे एका समाजाच्या वस्तीवर दगडफेक आणि मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द भारतीय न्याय संहिता आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल भिकाजी भोसले (वय 30, रा. गुंडेगाव) यांनी गुरूवारी (18 जून) फिर्याद दिली आहे. बुधवारी (17 जून) रोजी सायंकाळी घटना घडली आहे. बाबासाहेब एकनाथ कोतकर, अशोक हरिभाऊ कोतकर, राहुल विठ्ठल कोतकर, कुणाल बाबासाहेब कोतकर आणि संदीप पंडित भापकर (सर्व रा. गुंडेगाव) यांच्याविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

संशयित आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादी विशाल भोसले, त्यांचे वडील भिकाजी भोसले आणि चुलत भाऊ महेश संभाजी भोसले यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. यावेळी महेश भोसले हे जखमी झाले आहेत. संशयित आरोपींनी फिर्यादीच्या कुटुंबाला आणि वस्तीवरील इतर लोकांना जातीवाचक शिवीगाळ करत, तुम्हाला तलवारीने कापून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. टिपरसे करीत आहेत.

ताज्या बातम्या

पूरग्रस्त चांदोरी व सायखेडा परिसराची सीईओ ओमकार पवार यांची पाहणी

0
निफाड | जिमाका वृत्तसेवा Niphad नाशिक जिल्ह्यात 23 व 24 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन निफाड तालुक्यातील चांदोरी व सायखेडा...