Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: ‘कॉकरोच’ म्हणून हिणवणे योग्य नाही'…; जंतरमंतरवरील आंदोलनावर उद्धव ठाकरेंचा केंद्र...

Uddhav Thackeray: ‘कॉकरोच’ म्हणून हिणवणे योग्य नाही’…; जंतरमंतरवरील आंदोलनावर उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला इशारा

मुंबई | Mumbai
देशभरात गाजत असलेल्या NEET परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतून भारतात येत या आंदोलनाची धार आणखी तीव्र केली. याच आंदोलनाचा दाखला देत माजी मुख्यमंत्रीमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्त्वात नवी दिल्लीतील जंतरमंतरवर तरुणांकडून आंदोलन करण्यात आले. यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरु असलेल्या तरुणांच्या आंदोलनासंदर्भात निवेदन जारी केले आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या तरुणांना देशाचे भवितव्य, भाग्यविधाते म्हणतो ते वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणणत्या उन्हात रस्त्यावर उतरले असल्याचे म्हटलेय.

- Advertisement -

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोचचे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘कॉकरोच’ म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. NEET पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण-तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. कॉकरोच ना कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने दिला आहे!, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तर पुन्हा आंदोलन करणार
नवी दिल्लीतील जंतर मंतरवर अभिजीत दीपके यांच्या नेतृत्त्वात सुरु असलेल्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत परवानगी दिली आली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर पुढच्या शनिवारी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दीपके यांच्याकडून देण्यात आला आहे.

Devendra Fadnavis: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांच प्रत्युत्तर; म्हणाले, माझंही मत आहे की…

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...