Saturday, April 4, 2026
HomeनगरAhilyanagar : 53 हजार विद्यार्थी ‘अपार’ शिल्लक

Ahilyanagar : 53 हजार विद्यार्थी ‘अपार’ शिल्लक

संगमनेर, नेवासा, नगर मनपा, कोपरगाव, शेवगाव पिछाडीवर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विद्यार्थ्यांचे अपार ओळखपत्र तयार करण्यासाठी केंद्र शासनाने 31 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत दिली होती. या मुदतीत विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नाव व शैक्षणिक नोंदीतील नाव एकसमान करून ओळखपत्र निर्मिती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अद्याप नगर जिल्ह्यात 52 हजार 976 विद्यार्थ्यांचे अपार ओळखपत्र काढण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यात 8 लाख 38 हजार 718 विद्यार्थ्यांपैकी 7 लाख 85 हजार 404 अपार कार्ड काढण्यात आलेले आहे. त्याची टक्केवारी 93.68 टक्के आहे.

- Advertisement -

यापूर्वी विद्यार्थ्यांचे अपार ओळखपत्र तयार करण्यासाठी केंद्र शासनाने 31 जानेवारीपर्यंत अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर सरकार पातळीवरून कोणत्याच सुचना न आल्याने गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात अपार नोंदणीचे काम संथगतीने सुरू आहे. दरम्यान यापूर्वी नोंदणी झालेल्या अपार नोंदीची प्रमाणिकरण सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पहिली ते बारावी, अशा एकूण 5 हजार 262 शाळांत 8 लाख 38 हजार 858 विद्यार्थी आहेत. त्यातील 7 लाख 85 हजार 404 विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले असून 7 लाख 85 हजार 742 जण (93.68 टक्के) अपार प्रमाणपत्र काढण्यात आलेले आहेत. तर 52 हजार 976 विद्यार्थ्यांचे अपार अद्यापही काढलेले नाही.

अनेक तांत्रिक अडथळे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी देण्यात येणारा एकात्मिक शैक्षणिक ओळख क्रमांक म्हणजे अपार आयडी होय. तो नसल्यास डिजिटल शैक्षणिक नोंदींमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहनही करण्यात येत आहे. आधार कार्ड व शालेय नोंदीदरम्यान नावात तफावत, पालकांची माहिती अपूर्ण असणे, तसेच तांत्रिक अडथळे या प्रमुख अडचणी येत आहेत.

आयडीसाठी सक्ती नाही
शाळेमार्फत किंवा अधिकृत पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करून अपार आयडी तयार करता येतो. अपार आयडीसाठी पालकांचे संमतीपत्र पालकांनी भरून स्वाक्षरी करून शाळेमध्ये देणे आवश्यक असते. शासनाकडून अपार आयडीसाठी सक्ती केलेली नाही. मात्र सीईटी, नीट, जेईई अशा प्रवेश परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी अपार आयडी लागत आहे.

सुट्टीच्या दिवशी सीईंओकडून आढावा
रविवार (दि. 2) मार्च रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भंडारी यांनी शिक्षण विभागातील अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी व संबंधीतांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत रखडलेली अपार प्रमाणपत्र नोंदणी, आधार कार्ड नोंदणी, माजी संघ नोंदणी आणि वाचन कटट्ा याबाबत आढावा घेतला. तसेच रखडलेले उपक्रम तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या.

अपार नोंदणी बाकी
कर्जत 1531, अकोले 2457, जामखेड 2591, श्रीरामपूर 2648, पारनेर 2731, श्रीगोंदा 2867, नगर 3185, राहुरी 3391, राहाता 3525, शेवगाव 3701, कोपगरगाव 4038, पाथर्डी 4088, मनपा 4226, नेवासा 5594, संगमनेर 6403 असे आहेत.

ताज्या बातम्या

बारामती

Jay Pawar: त्यामुळे विरोधकांना लढायचं असेल तर लढावं, पण…; बारामती पोटनिवडणुकीसाठी...

0
बारामती | Baramatiअजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सोमवारी भरणार आहेत. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होईल,...