Thursday, March 13, 2025
Homeक्राईमवर्गात कोंडून विद्यार्थ्याला मारहाण

वर्गात कोंडून विद्यार्थ्याला मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भिंगार हद्दीतील मळगंगा माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याला त्याच्या वर्गातच पती- पत्नीने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास घडली. पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मच्छिंद्र भानुदास बेरड, दिपमाला मच्छिंद्र बेरड (दोघे रा. दरेवाडी, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती- पत्नीची नावे आहेत. फिर्यादी दरेवाडी शिवारात राहत असून त्यांचा मुलगा मळगंगा माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेतो. शुक्रवारी सकाळी 11.30 च्या सुमारास त्यांचा मुलगा वर्गात उपस्थित असताना मच्छिंद्र बेरड व त्याची पत्नी दीपमाला यांनी जबरदस्तीने वर्गाचा दरवाजा बंद करून त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. मच्छिंद्रने त्याच्या पाठीवर, मानेवर व पायावर वार केले, तर दीपमालाने शरीराच्या गुप्त भागावर हल्ला केला.

ही घटना घडल्यानंतर विद्यार्थ्याने घरी जाऊन घडलेला प्रकार सांगितला. त्याला उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या वडिलांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलीस अंमलदार एन. एस. पठारे अधिक तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...