येवला | प्रतिनिधी Yeola
तालुक्यातील बाभुळगाव येथील तळ्यात बुडून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
येवला – पाटोदा रोडवर असलेल्या बाभुळगाव शिवारातील पाण्याच्या तळ्यामध्ये गुरुवारी, (दि. ३०) सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास विद्यार्थी आशिष काळे (वय २०) रा. बोरसर ता. वैजापूर हा बुडाल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक पोहणाऱ्या ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
बाभुळगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आशिष प्रथम वर्ष वर्गात शिकत होता. खाजगी रुग्णवाहिकेने मृतदेह शवविच्छेदनासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.