Saturday, October 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकमध्ये विद्यार्थ्यांची निदर्शने; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांची निदर्शने; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

देशातील नागरिकांच्या संविधानात्मक आणि मतदानाच्या मूलभूत अधिकारांवर होत असलेल्या कथित आघाताच्या विरोधात आज नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत शहरभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत भव्य कँडल मार्च काढला. 

अशोक स्तंभावरून मोर्चाला सुरुवात, पोलिसांची कारवाई
हा कँडल मार्च नाशिकमधील ऐतिहासिक अशोक स्तंभ परिसरातून सुरू करण्यात आला होता. विद्यार्थी हातात मोबाईल टोर्च , पोस्टर्स आणि बॅनर घेऊन ज्ञानेश कुमार, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. मात्र, मोर्चा सुरू होताच आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणावर तैनात असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि अनेक आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. 

आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी नेत्यांनी सह विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाच्या या कारवाईचा आणि दडपशाहीचा तीव्र निषेध केला. आंदोलकांनी मांडलेले मूलभूत अधिकारांचे रक्षण: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मतदानाच्या आणि संविधानात्मक अधिकारांवर ज्ञानेश कुमार आणि सत्ताधारी पक्षाकडून गदा आणली जात आहे, असा थेट आरोप विद्यार्थ्यांनी केला. 

दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलकांवर झालेल्या दडपशाहीचा निषेध नोंदवत, आता देशातील प्रत्येक शहरात ‘जंतर-मंतर’सारखा लढा उभा राहिला आहे आणि नाशिकमध्येही हा संग्राम सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला. 

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी: ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे. 

नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता
विद्यार्थ्यांची धरपकड आणि अटकेच्या कारवाईनंतर अशोक स्तंभ आणि आसपासच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी जमावाला पांगवले असले तरीही, “जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील,” असा निर्धार आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.या नंतर हा कँडल मोर्चा निघाला असून बाबा साहेब पुतळ्या पर्यंत पोचला.

ताज्या बातम्या