Monday, August 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक जिल्ह्यातील भूखंड गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन

नाशिक जिल्ह्यातील भूखंड गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मौजे संगमेश्वर आणि गुगळगाव येथील भूखंड अदलाबदलीतील गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांचे तात्काळ निलंबन करण्यात येत असल्याची घोषणा महसूल चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

या प्रकरणी आठ मुद्रांक अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देत बावनकुळे यांनी दोषींवर कडक कारवाईचे संकेत दिले. तसेच स्टॅम्पवेंडर जाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

उदय किसवे यांनी संगमेश्वरची जमीन गुगळगावला आणि गुगळगावची जमीन संगमेश्वरला स्वॅप करून नियमांचा भंग केला. यामुळे त्यांचे निलंबन करत एका महिन्याच्या आत विभागीय चौकशी पूर्ण करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी यावेळी दिले.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...