Sunday, November 8, 2026
Homeनगरपाचेगाव येथे आगीत 10 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक

पाचेगाव येथे आगीत 10 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक

पाचेगाव फाटा |वार्ताहर| Pachegaon Phata

नेवासा तालुक्यातील पाचेगावमध्ये पाचेगाव फाटा ते पाचेगाव मुख्य रस्त्याच्या लागत असणार्‍या गट 29 मध्ये 10 एकर उसाच्या क्षेत्राला अचानक आग लागल्याने या आगीत संपूर्ण ऊस खाक झाला आहे. त्यात चार एकरवर असणार्‍या उसातील ठिबक देखील या आगीत जळून खाक झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

- Advertisement -

13 ऑक्टोबर रोजी गट नंबर 29 मध्ये राहुल हरिभाऊ नांदे यांच्या मालकीच्या पाच एकरवर असणार्‍या उसाच्या शेता शेजारील सोयाबीन पिकांचे सोगणी होऊन खळे झाले. त्या क्षेत्रात सोयाबीनचे काड पडलेले होते, ते काड मालक व गडी यांनी पेटवून दिल्यानंतर शेजारील उसाला आग लागली. ही घटना सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली. आगीची तीव्रता जास्त असल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी मनुष्यबळ काही करु शकले नाही.

त्यात उसाला जोडून पोपट दत्तात्रय नांदे यांच्या पाच एकरवरील उसाला देखील आग लागली. वार्‍यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून देखील पूर्ण दहा एकर ऊस गळीत तोडण्यास आलेला या आगीत ऊस भस्मसात झाला.त्यात चार एकर असणार्‍या ठिबक देखील या आगीत जळून गेले.काही स्थानिक ग्रामस्थांनी नेवासा नगरपंचायतीचे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. थोडाफार ऊस विझविण्यासाठी यश आले असले तरी दोन्ही शेतकर्‍यांचे दहा लाखाच्या आसपास मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

त्यात हा ऊस अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतो, पण सध्या अशोक कारखाना अजून सुरू न झाल्याने आगीत जळलेल्या ऊसाची विल्हेवाट इतर करखान्याला ऊस देऊन करावी लागेल.त्यामुळे शेतकर्‍यांना अजून मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आसपास सगळे उसाचे क्षेत्र असल्याने व जोरदार वार्‍यामुळे काहीकाळ शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ताज्या बातम्या

Pathardi : भगवानगडाच्या पायथ्याशी विहिरीत आढळले आठ दुचाकीचे सांगाडे

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या (Bhagwangad) पायथ्याशी घोगस पारगाव रस्त्यालगत असलेल्या जुन्या विहिरीमध्ये (Well) तब्बल आठ दुचाकीचे सांगाडे व अवशेष आढळून आल्याने...