Friday, August 28, 2026
HomeनगरAhilyanagar : साखर विक्रेते, वितरकांना नोंदणी बंधनकारक

Ahilyanagar : साखर विक्रेते, वितरकांना नोंदणी बंधनकारक

साठा तपासण्यासाठी विशेष तपासणी मोहीम || प्रत्येक जिल्ह्यात पथके स्थापन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

साखरेचा साठा, विक्री आणि वाहतुकीवर बारकाईने देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारने राज्यभर विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने गुरुवार, 27 ऑगस्टपासून ही मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या अंतर्गत साखर कारखाने, वितरक, व्यापारी तसेच मोठ्या ग्राहकांकडील साठ्याची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या दि. 28 जुलै 2026 रोजीच्या अधिसूचनेनुसार साखरेवर साठा निर्बंध लागू करण्यात आले असून, हे निर्बंध 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत लागू राहणार आहेत. त्यानुसार साखर विक्रेते व वितरकांना साखर प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. तसेच कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी 4,000 क्विंटल (400 मेट्रिक टनांपेक्षा) अधिक साखरेचा साठा ठेवता येणार नाही.
राज्यातील सर्व साखर विक्रेते आणि वितरकांनी अन्नसाठा देखरेख पोर्टलवर तातडीने नोंदणी करून सध्याच्या साठ्याची माहिती भरावी, तसेच प्रत्येक शुक्रवारी ही माहिती अद्ययावत करावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे. पोर्टलवर नोंदणी न करणे किंवा चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे ही गंभीर अनियमितता मानली जाणार असून, दोषींवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल.

तपासणीदरम्यान व्यापार्‍याच्या गोदामातील प्रत्यक्ष साठ्याची मोजणी करून ती साठा, खरेदी-विक्री नोंदवहीतील नोंदी आणि पोर्टलवर जाहीर केलेल्या साठ्याशी पडताळली जाणार आहे. खरेदी पावत्या, चलने, गेट पास, वाहतूक व पाठवणीसंबंधी कागदपत्रांचीही तपासणी केली जाणार आहे. प्रत्यक्ष साठा आणि जाहीर केलेल्या साठ्यात तफावत आढळल्यास त्याची तपशीलवार नोंद केली जाईल. तपासणीदरम्यान साठ्याचे छायाचित्रे, संबंधित नोंदी आणि कागदपत्रे पुरावे म्हणून संकलित केली जाणार आहेत. नियमभंग किंवा अनियमितता आढळल्यास संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 आणि प्रचलित नियमांनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. या कारवाईचा अहवाल नोडल अधिकार्‍यामार्फत शासनाला सादर करावा लागणार आहे.

विशेष तपासणी पथकांची स्थापना –
राज्यातील साखर कारखाने, वितरक, व्यापारी व मोठे ग्राहक यांच्या स्तरावरील साखरेचा साठा. विक्री व पाठवणी यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सदर मोहीम दिनांक 27.08.2026 (गुरुवार) पासून राबविण्यात येणार आहे. सदर साठा पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष तपासणी पथकाचे गठण करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी (अध्यक्ष), जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (सदस्य), साखर आयुक्त कार्यालयाचे सदर जिल्ह्याकरिता नियुक्त असलेले प्रतिनिधी (सदस्य), निरिक्षक, वैधमापन शाखा (सदस्य), पोलीस अधिक्षक / पोलीस निरिक्षक दर्जाचे अधिकारी (सदस्य),

साखरेचे दर क्विंटलमागे 4800 रूपयांपर्यंत खाली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

साखरेच्या दरातील घसरण गुरूवारीही चालूच राहिली. काल एम साखरेला 4950 रूपये प्रति क्विंटल, सुपर 4850 रूपये, तर एस 4800 रूपयांचा दर मिळाला. चार दिवसांत क्विंटलमागे तब्बल 2000 ते 2200 रूपयांची घसरण झाली. संभाव्य टंचाई आणि साठेबाजीच्या संशयावरून केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या उपायोजनांमुळे हे दर खाली आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दहा वर्षांच्या अटीमुळे निवडणुकीतून बाहेर पडलेल्यांना संधी?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सहकार संस्था निवडणूक नियम 2014 च्या 10 मधील...