Sunday, September 20, 2026
HomeनगरAhilyanagar : उस गाळप परवान्यासाठी नगरमधून 22 ऑनलाईन अर्ज

Ahilyanagar : उस गाळप परवान्यासाठी नगरमधून 22 ऑनलाईन अर्ज

राज्यातून 127 अर्ज || यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्यातील 2026-27 च्या उस गाळप हंगामासाठी आतापर्यंत 127 साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी साखर आयुक्तांकडे ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत. यामध्ये 66 सहकारी व 61 खासगी साखर कारखान्यांचा समावेश असून यात अहिल्यानगर जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यांचा समावेश असल्याची माहिती साखर सहसंचालक नगर यांच्या कार्यालयाचे वतीने देण्यात आली. दरम्यान राज्यातील यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

- Advertisement -

राज्याच्या साखर आयुक्तांकडे गाळप हंगाम ऑनलाईन परवान्यासाठी सर्वाधिक अर्ज कोल्हापूर व सोलापूर विभागातून प्रत्येकी 24 याप्रमाणे आलेले असून पुणे विभागातून 21 तर अहिल्यानगर विभागातून 22 अर्जांचा समावेश आहे. नांदेड विभागातून 18 छत्रपती संभाजीनगर विभागातून 16 तर अमरावती आणि नागपूर विभागातून प्रत्येकी एका अर्जाचा समावेश आहे. नगर विभागातून ऑनलाईन आलेल्या गाळप परवाना अर्जात 12 सहकारी साखर कारखाने व 10 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. यंदाच्या काळात हंगामासाठी राज्यात सुमारे 15.48 हेक्टर क्षेत्रावर ऊस गाळापासाठी उपलब्ध अपुरा पाऊस व काही भागातील पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती याचा प्रत्यक्षात गाळेपासाठी उपलब्ध होणार्‍या उसावर होणार आहे.

विभागनिहाय गाळप परवाना अर्ज
अहिल्यानगर 22 (12 सहकारी, 10 खासगी), अमरावती 1 (1 खासगी), छत्रपती संभाजीनगर : 16 (8 सहकारी, 8 खासगी), कोल्हापूर 24 (18 सहकारी, 6 खासगी), नागपूर 1 (1 खासगी), नांदेड 18 (6 सहकारी, 12 खासगी), पुणे 21 (13 सहकारी, 8 खासगी), सोलापूर : 24 (9 सहकारी, 15 खासगी), एकूण : 127 (66 सहकारी, 61 खासगी).

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँक बिनविरोध व्हावी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सहमतीचे राजकारण आणि सहमतीने निर्णय घेण्याचे ब्रीद जपत गेल्या 70 वर्षांहून अधिक काळ वाटचाल करणार्‍या अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची आगामी संचालक मंडळाची...