Wednesday, February 19, 2025
Homeक्राईमआत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पत्नी व प्रियकर गजाआड

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पत्नी व प्रियकर गजाआड

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

आत्महत्येस प्रवृत्त करून पसार झालेल्या पत्नी व तिच्या प्रियकराच्या पोलीस पथकाने मुसक्या आवळून गजाआड केले. पत्नीला पतीचा दशक्रियाविधी होताच ताब्यात घेतले तर प्रियकराला राहुरी तालुक्यातील ताहराबाद परिसरातून ताब्यात घेतले आहे. राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील एका विविहित तरुणानेे शनिवार दि. 28 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र त्याने गळफास घेण्यापूर्वी सर्व घटना एका चिठ्ठीत लिहून ठेवली तसेच त्याच्या मोबाईलवर रेकॉर्ड करून ठेवले.

- Advertisement -

मयत तरुणाच्या पत्नीचे शेजारीच राहणार्‍या रवी एकनाथ गांगड या तरुणाशी संबंध होते. आरोपींनी अनेक वेळा मयताला दमदाटी करुन मारहाण केली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून या तरुणाने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच आरोपींना अटक झाली पाहिजे. असा मजकूर त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आढळून आला आहे. नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून मयताची पत्नी तसेच तिचा प्रियकर रवी एकनाथ गांगड, सचिन एकनाथ गांगड, रा. ताहराबाद, ता. राहुरी, या तिघांवर भारतीय न्याय संहिता कलम 108, 115 (2), 351 (2), 351 (3), 3 (5) प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक समाधान फडोळ, पोलीस नाईक रवींद्र कांबळे, रामनाथ सानप, अविनाश दुधाडे आदी पोलीस पथकाने ताहराबाद परिसरात आरोपींचा शोध घेतला.

यावेळी आरोपी सचिन एकनाथ गांगड याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. मात्र मुख्य आरोपी रवींद्र गांगड व मयताची पत्नी हे दोघे पसार झाले होते. पथकाने आरोपी रवींद्र एकनाथ गांगड याच्या 5 जानेवारी रोजी मुसक्या आवळून ताब्यात घेतले. तर मयत रमेश उर्फ रामा गांगड याच्या दशक्रियाविधीच्या कार्यक्रमा ठिकाणी त्याची पत्नीला दशक्रिया विधीचा कार्यक्रम होताच ताब्यात घेऊन गजाआड केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या