Monday, October 14, 2024
Homeधुळेधक्कादायक : धुळ्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

धक्कादायक : धुळ्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

घरातून दुर्गंधी आल्याने उघडकीस आली घटना

धुळे | Dhule

शहरातील देवपूर भागातील प्रमोद नगरात एकाच कुटुंबातील आई- वडील आणि दोघा मुलांनी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून घटनेमुळे परिसरातील नागरिक मात्र सुन्न झाले आहे. आत्महत्या मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी या सदन कुटूंबाने एवढे टाकाचे पाऊस का उचलले असावे, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

- Advertisement -

प्रवीण मानसिंग गिरासे (वय ५२), दीपा प्रवीण गिरासे (वय ४४), मितेश प्रवीण गिरासे (वय १८) व सोहम प्रवीण गिरासे (वय १३) अशी चौघा मृताची नावे आहेत. प्रवीण गिरासे यांचे पारोळा रोडवर आर.आर पाटील कॉम्पलेक्समध्ये कामधेनू ऍग्रो नावाचे फर्टिलायझरचे दुकान आहे. ते पत्नी आणि दोन मुलांसह प्रमोद नगर समर्थ कॉलनीत वास्तव्यास होते. मंगळवारी आपण मुलाच्या डमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी परिसरातील नागरिकांना सांगितले होते. मात्र, मंगळवारपासून घराचा दरवाजा बंद दिसत होता. तर प्रवीण गिरासे यांची बहीण संगीता योगेंद्रसिंग राजपूत या देखील त्यांच्याशी तीन ते चार दिवसांपासून संपर्क साधत होत्या. मात्र संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्या देखील काळजीत होत्या. दरम्यान कालपासून गिरासे यांच्या घरातून दुर्गधी येत असल्यामुळे नागरिकांना संशय आला. त्यांनी गिरासे यांच्या बहीणीला कळविले.

आज सकाळच्या सुमारास बहीण संगिता राजपूत व नातेवाईक प्रवीण गिरासे यांना भेटण्यासाठी घरी आले. घराचा दरवाजा वरच्यावर लावण्यात आलेला होता. तो त्यांनी उघडला असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रविण गिरासे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर तिघे विषारी पदार्थाचे सेवन करून मृतावस्थेत पडलेले होते.  हे दृष्य पाहुन त्यांच्यासह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. हा प्रकार समजल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एलसीबीबचे पीएसआय प्रकाश पाटील, हवालदार संतोष हिरे, प्रकाश सोनार, निलेश पोतदार, देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे पीएसआय किरण कौठुळे, हवालदार चंद्रकांत नागरे, सुनील राठोड तसेच सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब गिरासे, माजी नगरसेवक कमलेश देवरे, माजी नगरसेवक भगवान गवळी, प्रफुल्ल पाटील, अमित दुसाने यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गाव घेतली होती. 

- Advertisment -

ताज्या बातम्या