Monday, September 28, 2026
Homeजळगावसुजाता बागूल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

सुजाता बागूल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

जळगाव – jalgaon
जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहायक परिचारिका व मिडवाइफ सुश्री सुजाता अशोक बागूल (Sujata Bagul) यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने (National Florence Nightingale Award) आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेल्या भव्य समारंभात राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या 15 परिचारिका आणि परिचारकांचा आज गौरव करण्यात आला. या सोहळ्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव, अनुप्रिया पटेल आणि आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते.

- Advertisement -

आरोग्य क्षेत्रात गेली 18 वर्षे अत्यंत निष्ठेने, कष्टाने व समर्पित भावनेने सेवा बजावणाऱ्या सुश्री बागूल यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थात्मक प्रसवासाठी गरोदर महिलांना प्रोत्साहन देणे, लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करणे, आरोग्य शिबिरे, जनजागृती रॅली आणि स्वच्छता मोहिमांमध्ये प्रभावी सहभाग यांसारखे उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिचारिका व आरोग्य सेविकांचे कोरोनाकाळात केलेल्या कामाचे मुक्तकंठाने कौतुक करत, त्यांच्या योगदानासाठी पत्राद्वारे सुजाता बागूल यांचा विशेष उल्लेख करून सन्मान केला होता. कोविड काळातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना जिल्हास्तरीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’सह विविध पुरस्कारांनी ही सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक प्रशस्तीपत्र आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...