Sunday, August 16, 2026
Homeराजकीयनांदेडमधील जीवघेण्या हल्ल्यानंतर पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांची पहिली प्रतिक्रिया,...

नांदेडमधील जीवघेण्या हल्ल्यानंतर पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नांदेड । Nanded

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेड येथील ऐतिहासिक गुरुद्वाराबाहेर एका निहंग शिखाने जीवघेणा हल्ला केला. मात्र, सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे आणि दैवबळाने बादल या हल्ल्यातून सुखरूप वाचले असून, त्यांच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्णालयातून बाहेर पडत त्यांनी, “ना मी घाबरलोय, ना मी घाबरणार!” असा ठाम निर्धार व्यक्त केला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहराच्या वेशीवर असलेल्या ‘गुरुद्वारा माता साहिब देवान जी मुगत’ येथे सुखबीर सिंग बादल दर्शनासाठी आले होते. त्यावेळी जसपाल सिंग नावाच्या निहंग शिखाने अचानक कृपाण काढून त्यांच्यावर प्राणघातक वार केला. सुरक्षारक्षकाने तात्काळ प्रसंगावधान राखून हल्लेखोराला रोखल्यामुळे कृपाण थेट लागली नाही; तरीही बादल यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने नांदेडमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बादल यांच्या हाताची शस्त्रक्रिया सुमारे दीड तास चालली. धारदार कृपाण लागल्याने त्यांच्या हाताचा टेंडन (स्नायूबंध) कापला गेला होता आणि जखम खूप खोल होती. प्लास्टिक सर्जनच्या पथकाने त्यांच्या टेंडनसह ‘अल्नार आर्टरी’ आणि मज्जातंतूची (नर्व्ह) दुरुस्ती केली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयाच्या पायऱ्यांवरून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बादल म्हणाले, “मी आता पूर्णपणे ठीक आहे. पंजाब आणि संपूर्ण देशात शांतता भंग करू इच्छिणाऱ्या काही विघातक शक्ती सक्रिय आहेत. शिरोमणी अकाली दल हा त्यांच्या वाईट उद्देशांच्या मार्गातील मोठा अडथळा वाटतो, म्हणूनच हे षड्यंत्र रचले गेले.”

आपल्या भावना व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, “सर्व काही ईश्वराच्या हातात आहे. मी गुरू गोविंद सिंगजी महाराज यांचे आभार मानतो. वर्षभरापूर्वी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात मी प्रायश्चित्त करत असतानाही असाच जीवघेणा हल्ला झाला होता. पंजाबची शांतता बिघडवणे हा या शक्तींचा हेतू आहे; पण अकाली दलाचा अध्यक्ष म्हणून मी हे कधीही होऊ देणार नाही.”

ताज्या बातम्या

Nashik News : सुट्टीमुळे सप्तशृंगी गड घाटात वाहतूक कोंडी; भाविक संतप्त

0
सप्तशृंगीगड | वार्ताहर | स्वातंत्र्यदिनाच्या लांब सुट्टीमुळे श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad Ghat) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे गडाकडे जाणाऱ्या घाट...