Thursday, August 20, 2026
HomeनगरShrigonda : पुरवठा विभागाचा कारभार चव्हाट्यावर

Shrigonda : पुरवठा विभागाचा कारभार चव्हाट्यावर

रेशनिंग दुकानातून धान्य विक्री प्रकरणातील अधिकारी रजेवर

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुका महसूल विभागाच्या पुरवठा शाखेत मका आणि इतर धान्याच्या वजनातील तफावत प्रकरण समोर आले आहे. शासकीय हमीभावाने खरेदी केलेली मका शासकीय गोदामात गोण्यांतून कमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुसरीकडे घोेगरगाव येथील शासकीय रेशनिंग दुकानातून धान्य बाहेर खुल्या बाजारात विक्री होत असल्याच्या तक्रार प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकार्‍याने तालुका पुरवठा अधिकार्‍याला खुलासा मागितल्यानंतर संबंधित अधिकारी रजेवर गेला आहे. तसेच याच प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकार्‍याने मयत असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराच्या नावाने चौकशीची नोटीस पाठवून लेखी खुलासा मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारांमुळे पुरवठा विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.

- Advertisement -

पुरवठा विभाग हा महसूल विभागाचा मुख्य भाग असून हजारो प्राधान्य व अंत्योदय लाभार्थ्यांना धान्य पुरवठा केला जातो. मात्र श्रीगोंद्यात एक पुरवठा अधिकारी, एक निरीक्षक आणि एक लिपिक यांच्यावर काम चालू असून, अतिरिक्त मदतीसाठी खाजगी कामगारांचीही मदत घेण्याची आवश्यकता भासत आहे. पुरवठा अधिकारी आठ दिवसांपासून रजेवर असल्याने कामे रेटली जात आहेत.

गोदामपाल व व्यवस्थापक यांच्यावर त्वरित कारवाई करावी, सर्व काम सेतू पोर्टल किंवा ई-गव्हर्नन्स प्रणालीद्वारे पारदर्शक करावे, अतिरिक्त अधिकारी व कर्मचारी नेमून काम सुरळीत चालवावे, स्वतंत्र तपास समितीद्वारे धान्य तफावतीचा अहवाल तयार करावा आदी मागण्या नागरीकांनी केल्या आहेत.

गोदामपाल आणि व्यवस्थापकावर कारवाई करा
श्रीगोंदा तालुक्यात सरकारी हमी भाव केंद्रावर खरेदी केलेली मका एक महिन्यात कशी कमी भरते आणि ज्या गोदाम व्यवस्थापक आणि गोदामपाल याच्या देखरेखीखाली मका खरेदी झाली तेच आता मका गोण्यात कमी असल्याचे सांगत असल्याने त्याच्यावर जबाबदारी नक्की करून कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर शेळके यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Crime News : एसटी कर्मचार्‍याचे अपहरण करून मारहाण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुणे बसस्थानक परिसरातून एका एसटी कर्मचार्‍याला तीन अनोळखी तरूणांनी दुचाकीवर जबरदस्तीने बसवून बुरूडगाव रोड परिसरातील मोकळ्या जागेत नेले. तेथे त्यांना शिवीगाळ व...