Friday, July 24, 2026
Homeदेश विदेशAhemdabad Airplane Crash: अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला...

Ahemdabad Airplane Crash: अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला पाठवली नोटीस

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या अपघाताला तीन महिने उलटले पण अजूनही अपघाताचे कारण समोर आलेले नाही. गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून १२ जून २०२५ रोजी एअर इंडियाचे विमान लंडनला निघाले होते. मात्र, टेकऑफच्या काही सेकंदात या विमानाचा मोठा अपघात झाला. या विमान अपघातात तब्बल २७० लोकांचा जागीच जीव गेला. या अपघातात फक्त एकच प्रवासी वाचला. या अपघाताला तीन महिने उलटून ही अपघाताचे खरे कारण काय ते पुढे येऊ शकले नाही. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

अहमदाबाद विमान अपघाताबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत विमान अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने एएआयबीच्या प्राथमिक तपासाला थेट बेजबाबदार म्हटले आहे. त्यांनी अहवालात थेट विमान अपघाताचे काही स्पष्ट कारण दिले नसून पायलटची चूक असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, स्पष्ट कोणतेही कारण त्यांनी त्या अहवालात दिले नाहीये. यामुळे कोर्टाने बेजबाबदार म्हटले.

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी घेतली. सर्वोच्च न्यायालयाने एएआयबीच्या प्राथमिक तपासाला ‘बेजबाबदार’ म्हटले. विमान अपघाताचे कारण स्पष्ट न करणाऱ्या अहवालात वैमानिकाची चूक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत अपघात दुर्दैवी असल्याचे म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

एका वृत्तानुसार, सेफ्टी मॅटर्स फाउंडेशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकेत एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

वकील प्रशांत भूषण यांच्या म्हणण्यानुसार, एअर इंडियाचे विमान, बोईंग ड्रीमलायनर 171 अनुभवी वैमानिक होते. आता या अपघाताला १०० दिवस झाली असूनही आतापर्यंत फक्त आणि फक्त प्राथमिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालातही विमान अपघाताचे कारण स्पष्टपणे सांगितलेले नाही. बोईंग विमानाचा अपघात इतका जास्त भयंकर होता की, या अपघाताचे काही धक्कादायक व्हिडीओही पुढे आली आहेत.

ताज्या बातम्या

Paper Leak Law : 10 कोटींचा दंड अन् 10 वर्षांची जेल;...

0
दिल्ली । Delhi देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे....